​ मकरंदने साधला विदयार्थांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 15:23 IST2016-12-17T15:23:48+5:302016-12-17T15:23:48+5:30

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एकत्र येऊन नाम या संस्थेची स्थापन केल्याचे तर आता सगळ््यांनाच माहिती आहे. या ...

Dialogues with the students of Makrand | ​ मकरंदने साधला विदयार्थांशी संवाद

​ मकरंदने साधला विदयार्थांशी संवाद

ना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एकत्र येऊन नाम या संस्थेची स्थापन केल्याचे तर आता सगळ््यांनाच माहिती आहे. या संस्थेदवारे हे दोघेही सामाजिक कार्य करत आहेत. दुष्काळग्रस्त गावांसाठी योगदान देण्याचा विडा नाना आणि मकरंद यांनी उचलला आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक गावांना दत्तक घेतले आहे. सिनेसृष्टीमध्ये नाव कमाविल्यानंतर सुदधा या दोघांनीही आपली सामाजिक जबाबदारी विसरलेली नाही. नाना आणि मकरंद यांच्या कामाचे कौतुक सगळीकडेच केले जात आहे. आता त्यांनी नामच्या वतीने अजुन एक गाव दत्तक घेतल्याचे समजले आहे. राज्यभरात दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि बºयाच सामाजिक कायासार्ठी पाऊल उचललेल्या नाम फाऊंडेशनने परभणी जिल्ह्यातील झरी गाव दत्तक घेतले आहे. या गावात जलशिवाराची कामे, वृक्षारोपण, महिला प्रशिक्षण केंद्र अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे हे गाव पाहण्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे नुकतेच झरीला भेट दिली. परभणी जिल्ह्यातील झरी येथे नाम फाऊंडेशनचे काम बघण्यासाठी आणि शेतकºयांशी संवाद साधण्यासाठी मकरंद आले होते. त्यावेळी त्यांनी झरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. मकरंदला भेटण्यासाठी यावेळी परिसरातील नागरिकांनी ही शाळेत मोठी गर्दी केली होती. सर्वांचा लाडका सिने कलावंत मकरंद अनासपूरे जेव्हा ग्रामीण भागातील एखाद्या शाळेत जातो त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आणि  चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही असेच काहीसे चित्र  परभणी जिल्ह्यातील झरी च्या जिल्हा परिषद शाळेत बघायला मिळाले. यावेळेस मकरंद अनासपूरेंनी शाळेतील मुलांशी संवाद साधला. शाळेत सगळ्या क्षेत्रामध्ये मुलीच पुढे आहेत,मुले करतात तरी काय ? मुलांनी पण अभ्यास करा असे देखील त्यांनी सांगितले.

Web Title: Dialogues with the students of Makrand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.