देवदत्त नागे लघुपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 16:49 IST2016-08-09T11:16:56+5:302016-08-09T16:49:13+5:30
जय मल्हार या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता देवदत्त नागे हा म मराठी या लघुपटात झळकणार आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती, अस्मिता या विषयावर आधारित हा लघुपट असणार आहे.

देवदत्त नागे लघुपटात
ज मल्हार या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता देवदत्त नागे हा म मराठी या लघुपटात झळकणार आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती, अस्मिता या विषयावर आधारित हा लघुपट असणार आहे. म मराठी या लघुपटाची निर्मिती श्रीराम समर्थ प्रॉडक्शन आणि अर्जुनराजे एंटरटेनमेंट यांनी केली आहे. या लघुपटाची कथा दिग्दर्शक सहदेव मा. घोलप यांनी लिहिली आहे.काही महिन्यांपूर्वीच या लघुपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून म मराठी या लघुपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. चला तर थोडी वाट पाहूयात प्रेक्षकांचा लाडका खंडेराय या लघुपटात कोणत्या भूमिकेत दिसणार आहे.