चिन्मय आणि गिरिजा अडकले लग्नाच्या बेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:58 IST2016-01-16T01:07:47+5:302016-02-04T14:58:35+5:30
स्वप्नांच्या पलीकडले आणि सध्या स्पीड घेत असलेल्या नांदा सौख्यभरे या मालिकेतून तरुणींना भुरळ पाडणारा अभिनेता चिन्मय उद्गीरकर व अभिनेत्री ...

चिन्मय आणि गिरिजा अडकले लग्नाच्या बेडीत
स वप्नांच्या पलीकडले आणि सध्या स्पीड घेत असलेल्या नांदा सौख्यभरे या मालिकेतून तरुणींना भुरळ पाडणारा अभिनेता चिन्मय उद्गीरकर व अभिनेत्री गिरिजा जोशी हे दोघे विवाहबंधनात अडक ले आहेत. या विवाह सोहळ्याप्रसंगी चित्रपट व नाट्यसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री गिरिजा जोशीने सतीश मोतीलिंग दिग्दर्शित 'प्रियतमा' या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिचे देऊळ बंद, वाजलीच पाहिजे असे तिचे चित्रपट प्रदर्शित झाले. विराज राजे यांनी दिग्दर्शित केलेल्या वाजलीच पाहिजे या चित्रपटात चिन्मय उद्गीरकर व गिरिजा जोशी यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात काम करताना चिन्मय व गिरिजा यांच्यातील मैत्री वाढली व मैत्रीचे रूपांतर विवाहबंधनात झाले.