आदर्श शिंदेचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून चाहत्यांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 14:13 IST2017-03-13T08:43:50+5:302017-03-13T14:13:50+5:30
‘’देवा तुझ्या गाभा-याला उंबराच नाही’’…दुनियादारी सिनेमातील गाण्यातून देवाला साद घालणा-या गायक आदर्श शिंदेच्या सूरांवर रसिकांनी मोहिनी घातली आहे. मात्र ...

आदर्श शिंदेचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून चाहत्यांची फसवणूक
‘ देवा तुझ्या गाभा-याला उंबराच नाही’’…दुनियादारी सिनेमातील गाण्यातून देवाला साद घालणा-या गायक आदर्श शिंदेच्या सूरांवर रसिकांनी मोहिनी घातली आहे. मात्र याच गायक आदर्श शिंदेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून अनेकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.बीडच्या आंबेजोगाई इथल्या तरूणाने हा प्रताप केला आहे. संतोष उजागरी नाव्या तरूणाने दोन वर्षापूर्वी आदर्श शिंदेच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयारे केले. या फेबुक अकाऊंटच्या माद्यमातून स्वत: आदर्श असल्याचं भासवत संतोषने अनेकांकडून पैसे उकळल्याची माहिती उघड झाली आहे.सिनसृष्टीत काम मिळवून देण्याटे आमिष देऊन संतोषने अनेकांकडून पैसे उकळल्याची माहीती समोर आली आहे.एका महिलेलाही संतोषने भुलवलं होते.आदर्श शिंदे असल्याचे सांगून संतोषने तिच्याकडे हजारो रूपये उकळले होते.फसवणूक झाल्याची शंका येताच या महिलेने थेट आदर्श शिंदे यांचे भाऊ उत्कर्ष शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि अखेर संतोषचे बिंग फुटलं.या सगळ्या फसवणूक प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस आरोपी संतोष उजागरे याचा शोध घेत आहेत.त्यामुळे सेलिब्रेटींच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अकाऊंटवरून त्यांच्याशी संपर्क साधताना काळजी घेण्याची गरज आहे.आदर्श शिंदेच्या बनावट फेसबुक अकाऊंटप्रमाणे अशी कित्येक फेक अकाऊंट सोशल मीडियावर आहेत.त्यामुळे अशा अकाऊंटवरून तुमचीही फसवणूक होण्यीच शक्यता आहे.त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.