मराठी चित्रपटसृष्टीत 'मास अपील' असलेल्या काही मोजक्या अभिनेत्यांमध्ये मकरंदचा समावेश अपरिहार्य आहे. त्याचा प्रत्यय ग्रामीण भागात मकरंद चित्रीकरण करताना ...
चाहत्यांच्या गराड्यात मकरंद
/>मराठी चित्रपटसृष्टीत 'मास अपील' असलेल्या काही मोजक्या अभिनेत्यांमध्ये मकरंदचा समावेश अपरिहार्य आहे. त्याचा प्रत्यय ग्रामीण भागात मकरंद चित्रीकरण करताना सहज येतो. रंगा पतंगा या चित्रपटाचं विदर्भातील मुर्तिजापूरजवळच्या गोरेगाव इथं चित्रीकरण करण्यात आलं. त्यावेळी मकरंदला पाहण्यासाठी अफाट गर्दी झाली होती. गोरेगावसह आजुबाजूच्या गावातले मकरंदचे चाहतेही गावात दाखल झाले होते. मकरंदची एक छबी टिपण्यासाठी, त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे मकरंद चित्रीकरण करताना काहीवेळा अडचणीही आल्या. मात्र, मकरंदनं चाहत्यांना नाराज केलं नाही. चाहत्यांच्या गराड्यात राहून मकरंदनं त्यांच्याशी संवाद साधत चित्रीकरण पूर्ण केलं.