कुशल बद्रिके का कंटाळला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 20:13 IST2016-12-02T20:13:04+5:302016-12-02T20:13:04+5:30

सर्व प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कुशल बद्रिके हा का कंटाळला असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला असणार हे ...

Bored of a skilled man? | कुशल बद्रिके का कंटाळला?

कुशल बद्रिके का कंटाळला?

्व प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता कुशल बद्रिके हा का कंटाळला असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला असणार हे मात्र नक्की. त्याचे हे कारण कळाल्यावरदेखील प्रेक्षकांना हसू आवरणार नाही हे देखील तितकेच खरे आहे. कारण नुकताच कुशल हा बायकोसोबत शॉपिंगला गेला होता. त्याची बायको पाच मिनिटीत येते सांगून गेली, दोन तास झाले तरी आलीच नाही. शेवटी तो कंटाळून आपल्या मुलासोबत एका बाकावर बसला आहे. कुशल आणि त्याचा मुलगा अक्षरश: रडण्याच्या परिस्थितीत असल्याचे त्याच्या फोटोमधून पाहायला मिळत आहे. त्याने त्याची ही सर्व कंटाळवाणी परिस्थिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याच्या या फोटोला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक कलाकार, चाहतेदेखील गंमतीशीर कमेंन्ट करताना दिसत आहेत. आपल्या कमेंन्टमधून दिग्दर्शक विजू माने सांगतात, कुशल तुला तरी जाहीरपणे सांगता आले. तर हेमांगी कवीदेखील मजेशीर कमेंन्ट करताना पाहायला मिळाली. तसेच चाहत्यांनीदेखील त्याच्या या विचारांना दुजोरा दिला असल्याचे पाहायला मिळाले. तसेच हा फोटो गणेश भारतपुरे याच्या मुलाने काढला आहे हे सांगयलादेखील कुशल विसरला नाही. कुशल सध्या चला हवा येऊ दया या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तसेच त्याने एक होता काऊ, एक वरचढ एक, माझा नवरा तुझी बायको, जत्रा, बायस्कोप असे अनेक चित्रपटदेखील केले आहेत. जागो मोहन प्यारे आणि लाली लिला असे नाटकदेखील त्याने प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. 

 

 

Web Title: Bored of a skilled man?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.