सीमा देव आणि अपर्णा सेन यांना जीवगौरव पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 11:54 IST2017-01-10T11:54:33+5:302017-01-10T11:54:33+5:30

यंदा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री सीमा देव आणि दिग्दर्शकअपर्णा सेन आणि यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार ...

Border Deva and Aparna Sen were awarded the Jivgaurav Award | सीमा देव आणि अपर्णा सेन यांना जीवगौरव पुरस्कार जाहीर

सीमा देव आणि अपर्णा सेन यांना जीवगौरव पुरस्कार जाहीर

दा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री सीमा देव आणि दिग्दर्शकअपर्णा सेन आणि यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा एस. डी. बर्मन पुरस्कार तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना देण्यात येणार आहे. महोत्सवाचे संचालक व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी ही माहिती एका पत्रकार परिषदेत दिली आहे. पिफचा उद्घाटन सोहळा १२ जानेवारीला कोथरूड सिटीप्राईड चित्रपटगृहात होणार आहे. या वेळी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. त्याचबरोबर दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिफ बझारमध्ये ओम पुरी  रंगमंच साकारण्यात येणार आहे.
         
    अभिनेत्री सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित जगाच्या पाठीवर  या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी सुवासिनी, आनंद अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तर उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबलावादनातील आपल्या वैशिष्टयपूर्ण शैलीसह संगीतकार म्हणूनही जगभरात आपला ठसा उमटवला.अपर्णा सेन या बंगाली चित्रपटसृष्टीत अभिनेत्री, दिग्दर्शक आणि पटकथालेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सत्यजित रे यांचा १९६१ मध्ये आलेला तीन कन्याहा अपर्णा सेन यांचा पहिला चित्रपट. दिग्दर्शनात ३६ चौरंघी लेन आणि मिस्टर अँड मिसेस अय्यरह्ण या चित्रपटांसाठी अपर्णा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.  महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमात यंदा स्पेनमधील प्रसिद्ध फ्लॅमेंको नृत्याचे सादरीकरण होणार आहे, तर उद्घाटनानंतर दिग्दर्शक बार्बरा एडर यांचा थँक यू फॉर बाँबिंग हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. 

Web Title: Border Deva and Aparna Sen were awarded the Jivgaurav Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.