बालमित्रांचा छोटा दोस्त 'बोक्या सातबंडे' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'योगयोगेश्वर जय शंकर' फेम आरुष साकारणार मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 06:29 PM2023-03-27T18:29:34+5:302023-03-28T13:03:08+5:30

'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत बाल शंकर महाराज यांच्या भूमिकेत दिसलेला हा बालकलाकार आता रंगभूमी गाजवण्यास सज्ज आहे. 

'Bokya Satbande' based on Dilip Prabhavalkar's National Award winning story will come as a drama | बालमित्रांचा छोटा दोस्त 'बोक्या सातबंडे' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'योगयोगेश्वर जय शंकर' फेम आरुष साकारणार मुख्य भूमिका

बालमित्रांचा छोटा दोस्त 'बोक्या सातबंडे' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'योगयोगेश्वर जय शंकर' फेम आरुष साकारणार मुख्य भूमिका

googlenewsNext

ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या लेखणीतून अवतरलेली 'बोक्या सातबंडे' कादंबरी आणि त्यातील बोक्याच्या करामती सर्वांनाच माहित आहेत. सुरुवातीला गोष्टींच्या माध्यमातून आणि नंतर चित्रपटाद्वारे रसिकांच्या भेटीला आलेला 'बोक्या सातबंडे' आता रंगभूमीवर अवतरणार आहे. दिलीप प्रभावळकरांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या  'बोक्या सातबंडे' या पुस्तकावर आधारलेलं 'बोक्या सातबंडे' हे व्यावसायिक नाटक लवकरच रंगमंचावर येणार आहे.

 

 'बोक्या सातबंडे' या बालनाट्यात बोक्याच्या भूमिकेतून आरुष बेडेकर हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत बाल शंकर महाराज यांच्या भूमिकेत दिसलेला हा बालकलाकार आता रंगभूमी गाजवण्यास सज्ज आहे.  पुस्तकामध्ये वाचलेल्या बोक्याच्या करामती आता रंगमंचावर पाहताना रसिकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं 'बोक्या सातबंडे' हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव देणारा असल्याचं मत दिग्दर्शक विक्रम पाटील यांनी व्यक्त केलं आहे. दीप्ती जोशी यांच्या म्हणण्यानुसार नाटकातील बोक्या सातबंडेचे कारनामे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरावेत असे असून, नेहमीच सावध राहून आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवल्यास येणाऱ्या संकटांचा धीरोदात्तपणे सामना करता येऊ शकतो असं काहीसं सांगणारे आहेत. शिवाय या नाटकाचे पोस्टर डिजाइन केले आहे गौरव सर्जेराव यांनी. 

गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निनाद म्हैसाळकर यांनी संगीत दिलं आहे. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी सेट बनवला असून, राहुल जोगळेकर यांनी प्रकाशयोजना केली आहे. वेशभूषा महेश शेरला यांनी केली असून, रंगभूषा कमलेश बिचे यांनी केली आहे. संतोष भांगरे यांनी कोरिओग्राफी केली आहे.
 

Web Title: 'Bokya Satbande' based on Dilip Prabhavalkar's National Award winning story will come as a drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.