Birthday Celebration:सिद्धार्थ चांदेकरला मिळाले खास बर्थ डे गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2017 13:08 IST2017-06-14T07:38:58+5:302017-06-14T13:08:58+5:30
मराठी सिनेइंडस्ट्रीचा देखणा हिरो सिद्धार्थ चांदेकरनं आपल्या मित्रांसह नुकताच वाढदिवस साजरा केला. छोटा पडदा तसेच मराठीतील दर्जेदार चित्रपटांमधून नावारूपास ...

Birthday Celebration:सिद्धार्थ चांदेकरला मिळाले खास बर्थ डे गिफ्ट!
म ाठी सिनेइंडस्ट्रीचा देखणा हिरो सिद्धार्थ चांदेकरनं आपल्या मित्रांसह नुकताच वाढदिवस साजरा केला. छोटा पडदा तसेच मराठीतील दर्जेदार चित्रपटांमधून नावारूपास आलेल्या सिद्धार्थचा आगामी 'बसस्टॉप' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळेच यावेळी सिध्दार्थसाठी डबल सेलिब्रेशन होते म्हणूनच सिनेमाच्या संपूर्ण टीमने सिद्धार्थचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. फक्त सेटवरच त्याचा बर्थ डे सेलिब्रेशन झाले असे नाही तर सोशल मीडियावरही सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले. काहींनी सुंदर स्केचेस रेखाटत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या तर काहींनी सुंदर मेसेजेस पाठवून त्याचा हा वाढदिवसाचा आनंद व्दिगुणीत केल्याचे पाहायला मिळाले.
गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाची मराठी रॅपर किंग जेडी म्हणजेच श्रेयश जाधव याने निर्मिती केली असून पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांचीदेखील यात महत्वाची भूमिका आहे. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमात अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. गतवर्षाचे राज्य पुरस्कार विजेते अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. शिवाय तरुणांचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी संगीत दिले आहे. ‘बसस्टॉप’ हा सिनेमा २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे येत्या 21 जुलैला बसस्टाॅप रसिकांना कितपत भावतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.