'ख्वाबों के परिंदे..!' मुक्ता बर्वेने शेअर केला ग्लॅमरस फोटो, होतोय कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 11:52 AM2021-02-13T11:52:24+5:302021-02-13T11:52:51+5:30

Glamorous photo shared by Mukta Barve : नुकताच मुक्ताने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'Birds of dreams ..!' Glamorous photo shared by Mukta Barve, is raining comments | 'ख्वाबों के परिंदे..!' मुक्ता बर्वेने शेअर केला ग्लॅमरस फोटो, होतोय कमेंट्सचा वर्षाव

'ख्वाबों के परिंदे..!' मुक्ता बर्वेने शेअर केला ग्लॅमरस फोटो, होतोय कमेंट्सचा वर्षाव

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे.मुक्ता बर्वे सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसते. मात्र बऱ्याचदा ती तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.नुकताच मुक्ताने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मुक्ता स्वतःच्याच सोबतीचा आनंद घेत असल्याचे सांगत आहे.

मुक्ता बर्वेने इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती एखाद्या समुद्रकिनारी उभी आहे. यावेळी तिने पिंक कलरचा स्लिव्ह लेस टॉप घातलेला असून डोळ्यावर गॉगलसुद्धा लावलेला दिसत आहे. या फोटोत मुक्ता फारच सुंदर दिसते आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘उडें, खुले आसमान में ख्वाबों के परिंदे | उडे, दिल के जहाँ मैं ख्वाबों के परिंदे|’.

मुक्ता सध्या व्हेकेशनवर आहे. त्यामुळे ती समुद्रकिनारी तिच्या सुट्ट्या घालवत आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांसोबत अनेक कलाकारांचेही विविध कमेंट पाहायला मिळत आहेत. या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत असल्याचे चाहते कमेंटद्वारे सांगत आहेत.

मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचेच नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडलं- बिघडलंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतरचे जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट प्रचंड गाजले.


चित्रपटात व्यग्र असतानाही मुक्ताने एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम केले होते. या मालिकेत स्वप्निल जोशी तिच्यासोबत झळकला होता. या मालिकेतील तिची भूमिका, स्वप्निलसोबतचे तिचे ट्युनिंग प्रेक्षकांना खूपच आवडले होते. मुक्ता आणि स्वप्निलच्या जोडीचा मुंबई पुणे मुंबई ३मधील केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा झाली होती. मुक्ता काही दिवसांपूर्वी स्माईल प्लीज सिनेमात दिसली होती.

Web Title: 'Birds of dreams ..!' Glamorous photo shared by Mukta Barve, is raining comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.