बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकेल असे आहे या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सौंदर्य, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 06:00 AM2019-12-24T06:00:00+5:302019-12-24T06:00:00+5:30

तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. फॅट टू फिट असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

The beauty of this Marathi actress Trupti Madhukar Toradmal who is going to beat Bollywood actresses, photo shared on social media | बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकेल असे आहे या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सौंदर्य, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकेल असे आहे या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सौंदर्य, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

googlenewsNext

स्वप्ना जोशी यांच्या 'सविता दामोदर परांजपे' या सिनेमातून  तृप्ती ती रसिकांच्या भेटीला आली होती. सुबोध भावेसह ती रुपेरी पडद्यावर झळकली. तृप्तीच्या अभिनयासोबतच  तिच्या सौदंर्यानेही रसिकांवर  तिने जादू केली. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिने फॅन्स आणि समीक्षकाची मनं जिंकली. तृप्ती सोशल  मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते. 


आता पुन्हा एक फोटो तृप्तीने शेअर केला आहे.या फोटोत तिच्या ग्लॅमरस तितकाच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. तिच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.

अगदी त्याचप्रमाणे तिची एक वेगळी स्टाइल आहे.त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे. तृप्ती किती स्टायलिश आहे हे तिचे इन्सटाग्राम अकाउंट पाहिल्यावर लगेचच कळते. तसेच गोल्डन कलरमध्ये शेअर केलेल्या फोटोत ती मस्यकन्ये प्रमाणे भासत आहे.

तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. फॅट टू फिट असा तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. जीममध्ये तासनतास घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. कामाचं दडपण तसंच दगदग यांत स्वतःला फिट ठेवणं हीसुद्धा काळाची गरज आहे.  तिचे हे व्हिडीओ पाहून  तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल हे मात्र नक्की.

Web Title: The beauty of this Marathi actress Trupti Madhukar Toradmal who is going to beat Bollywood actresses, photo shared on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.