शिक्षणाचा वेध घेणारा बारायण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 13:37 IST2017-11-13T08:07:51+5:302017-11-13T13:37:51+5:30
अतिशय हटके नाव असलेल्या ‘बारायण’ या आगामी चित्रपटाचे खूपच कल्पक पोस्टर १२ नोव्हेंबराला सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. ...
.jpg)
शिक्षणाचा वेध घेणारा बारायण!
दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या 'ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'चा हा चित्रपट नावाप्रमाणेच हटके असणार. पोस्टरमध्ये अतिशय कल्पकतेने मांडलेला चित्रपटाचा आशय, एका उत्तम कलाकृतीची ग्वाही देत आहे.एकंदरीतच मराठी सिनेसृष्टीला उत्तमोत्तम आशयघन चित्रपटांचा नजराणा लाभलेला आहे. नुकताच मराठी चित्रपटाला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आणि गोव्यात होणाऱ्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ मध्ये 'इंडियन पॅनोरमा' त,उल्लेखनीय संख्येने निवड झालेले मराठी चित्रपट, मराठी सिनेसृष्टीची उच्च अभिरुची अधोरेखित करतात. याच सिनेसृष्टीतील 'बारायण' हा एक उल्लेखनीय चित्रपट ठरेल.
पोस्टरमधील 'बारा' ला 'स्पेशल ट्रीटमेंट' देणारा ‘बारायण’ येत्या १२ जानेवारीला म्हणजे, तरुणांसाठी आदर्श असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला, राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल आणि सर्वच वेधक प्रश्नांची अचूक उत्तरं प्रेक्षकांना मिळतील !