साडीने ओटी भरली, केक कापला अन्...; 'बाईपण'च्या यशानंतर मैत्रिणींच्या कौतुकामुळे सुकन्या मोने भारावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:20 PM2023-08-08T12:20:19+5:302023-08-08T12:21:08+5:30

'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं सुकन्या मोनेंच्या मैत्रिणींनी असं साजरं केलं यश, पाहा व्हिडिओ

baipan bhari deva sukanya mone friends celebrated movie success actress get emotional | साडीने ओटी भरली, केक कापला अन्...; 'बाईपण'च्या यशानंतर मैत्रिणींच्या कौतुकामुळे सुकन्या मोने भारावल्या

साडीने ओटी भरली, केक कापला अन्...; 'बाईपण'च्या यशानंतर मैत्रिणींच्या कौतुकामुळे सुकन्या मोने भारावल्या

googlenewsNext

बहुचर्चित 'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाटी प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनट या चित्रपटाचे शो हाऊसफूल होत होते. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने विशेषत: महिला प्रेक्षकांच्या मनात घर केलं. बाईपण भारी देवा चित्रपटात मुख्य पात्र साकारलेल्या अभिनेत्रींचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. अभिनेत्री सुकन्या मोनेंनी या चित्रपटात साधना ही भूमिका साकारली आहे. बाईपणच्या यशानंतर सुकन्या मोनेंच्या मैत्रिणींनी त्यांचं अनोख्या पद्धतीने कौतुक केलं आहे. 

सुकन्या मोने यांच्या बालपणीच्या मैत्रिणींनी त्यांना खास सरप्राइज दिलं. बाईपणचं यश साजरं करण्यासाठी त्या एकत्र जमल्या होत्या. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत त्यांनी सुकन्या मोनेंचं स्वागत केलं. सुकन्या मोने यांचा फोटो मास्कही त्यांनी चेहऱ्यावर लावले होते. सगळ्या मैत्रिणींनी मिळून सुकन्या मोनेंचं औक्षण केलं. त्यानंतर साडी आणि नारळाने ओटी भरली. केक कापत सुकन्या मोनेंच्या मैत्रिणींनी बाईपणचं यश साजरं केलं. 

"माझी लाडकी प्राजक्ता...", 'राणी' म्हणत अमृता खानविलकरने प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा

मैत्रिणींनी केलेला हा कौतुक सोहळा पाहून सुकन्या मोनेही भारावून गेल्या होत्या. बाईपण भारी देवा चित्रपटाचं मैत्रिणींनी साजरं केलेलं यश पाहून त्यांचे डोळे पाणावले होते. त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. 

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे. अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत 'बाईपण भारी देवा' यशस्वी कामगिरी करत आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटात सुकन्या मोनेंसह दीपा परब, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टांगडी, सुचित्रा बांदेकर आणि वंदना गुप्ते या अभिनेत्रींनी काकडे सिस्टर्सची भूमिका साकारली आहे. 

Web Title: baipan bhari deva sukanya mone friends celebrated movie success actress get emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.