Baahubali 2:'देवसेना' लूकमध्ये मानसी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2017 11:37 AM2017-05-20T11:37:12+5:302017-05-20T17:07:12+5:30

अभिनेत्री मानसी नाईक जे काही करते त्याची कायम चर्चा होतच असते. मग ते बघतोय रिक्षावाला गाण्यावर थिरकणं असो किंवा ...

Baahubali 2: 'DevSena' in the Lukas Manasi! | Baahubali 2:'देवसेना' लूकमध्ये मानसी !

Baahubali 2:'देवसेना' लूकमध्ये मानसी !

googlenewsNext
िनेत्री मानसी नाईक जे काही करते त्याची कायम चर्चा होतच असते. मग ते बघतोय रिक्षावाला गाण्यावर थिरकणं असो किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमातील धम्माल डान्स परफॉर्मन्स. आपला डान्स आणि अदांनी मानसीनं मराठी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यामुळेच ती रसिकांची एक लाडकी अभिनेत्री आहे. रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी मानसी आपलं शंभर टक्के योगदान देत असते. तिच्या डान्स कौशल्यासोबतच तिच्या मादक अदा आणि ग्लॅमरस लूकच्याही तितक्याच चर्चा होतात. मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. कायमच आपल्या फॅशन स्टेटमेंटने ती रसिकांवर जादू करत असते. आता पुन्हा एकदा मानसीनं रसिकांवर जादू केली आहे. यावेळी तिनं आपल्या डान्सनं नाही तर आपल्या खास लूकनं रसिकांना आकर्षित केलं आहे. सध्या देशासह जगभरात 'बाहुबली-२' सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे करत आहे. या सिनेमातील बाहुबली, भल्लालदेव आणि सोबतच देवसेना या पात्रांचीही रसिकांमध्येही विशेष चर्चा आहे. बाहुबलीचा हाच फिव्हर मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकवरही झाल्याचं पाहायला मिळतंय. एका कार्यक्रमासाठी मानसी नाईकने देवसेनेचा लूक धारण केला होता. बाहुबली-२ सिनेमातील देवसेना या व्यक्तीरेखेपासून तिचा हा लूक प्रेरित होता. मानसीचा हा हटके लूक तिच्या चाहत्यांसाठीही सुखद धक्का होता. या लूकमध्ये मानसीचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे तिने हा फोटो फेसबुकवर शेअर करताच अवघ्या काही क्षणात त्याला लाईक आणि कमेंट्स येऊ लागल्या. फॅन्सला मानसीचा हा देवसेना लूक भलताच भावला आहे. 

Web Title: Baahubali 2: 'DevSena' in the Lukas Manasi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.