या इराणी चित्रपटाने मिळवला इफ्फीमध्ये पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 18:31 IST2016-11-29T18:31:28+5:302016-11-29T18:31:28+5:30

इफ्फी चित्रपट महोत्सवाची सांगता झाली असून चुरशीच्या ठरलेल्या गोल्डन पिकॉक' पुरस्कारावर इराणी चित्रपट 'डॉटर'ने आपली मोहर उमटवली आहे. रजा ...

Awarded by Iriyani, Iran won the award | या इराणी चित्रपटाने मिळवला इफ्फीमध्ये पुरस्कार

या इराणी चित्रपटाने मिळवला इफ्फीमध्ये पुरस्कार

्फी चित्रपट महोत्सवाची सांगता झाली असून चुरशीच्या ठरलेल्या गोल्डन पिकॉक' पुरस्कारावर इराणी चित्रपट 'डॉटर'ने आपली मोहर उमटवली आहे. रजा मीरकरिमी दिग्दर्शित 'डॉटर'ने २१ चित्रपटांना मागे सारत हा मानाचा पुरस्कार पटकवला. गोल्डन पिकॉक' पुरस्कार आणि ४० लाख रुपयांचे बक्षिस मिळवल्यानंतर मीरकरिमी म्हणाले, " अखेरचा धन्यवाद. या चित्रपटाचे श्रेय चित्रपटाचे अभ्यासक अब्बास किरोस्तामी (प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक ) यांना जाते. सामान्य कथामध्ये छोट्या छोट्या गोष्टी कशा लपलेल्या असतात हे त्यांनी मला शिकवले." सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकाचा पुरस्कार तुर्की चित्रपट 'रऊफ'चे दिग्दर्शक सोनर केनर यांना आणि बरिस काया यांना देण्यात आला. सिल्वर पिकॉक आणि १५ लाख रुपयांचे बक्षिस त्यांना विभागून मिळाले. सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरुष पुरस्कार इराणी अभिनेता फरहद असलानी याला 'डॉटर' मधील भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला. सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार लातवियाई चित्रपट 'मेलो मड'साठी इलिना वास्का हिला देण्यात आला. दोघांनाही सिल्व्हर पिकॉक आणि १० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. विशेष ज्यूरीचा पुरस्कार दक्षिण कोरियन दिग्दर्शक ली जोन-इक यांना 'दि थ्रोन' या चित्रपटासाठी देण्यात आला. त्यांना सिल्हर पिकॉकसह १५ लाखाचे बक्षिस देण्यात आले. अर्जेटीना/चिली येथील पीपा सन मार्टिन यांच्या 'रारा' या स्पॅनिश चित्रपटाला नव्या चित्रपटाचा शताब्दी पुरस्कार देण्यात आला. त्यांना सिल्हर पिकॉकसह १० लाखाचे बक्षिस देण्यात आले. इफ्फीच्या खास श्रेणीतील पुरस्कार-आईसीएफटी-यूनेस्को गांधी मेडलचा बहुमान तुर्की चित्रपट 'कोल्ड ऑफ कलंडार' याला मिळाला.
याचे दिग्दर्शन मुस्तफा कारा यांनी केले आहे. 

Web Title: Awarded by Iriyani, Iran won the award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.