अवधूतच्या शास्त्रीय संगिताची 'असेही एकदा व्हावे' झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 09:35 IST2018-04-04T04:05:47+5:302018-04-04T09:35:47+5:30

सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्तेची गाणी म्हंटली कि 'पॉप' संगीतप्रकार डोळ्यांसमोर येतो. मात्र, एकदा तरी अवधूतने शास्त्रीय संगीत ...

Avadhuta's classical music should be 'Once upon a time' | अवधूतच्या शास्त्रीय संगिताची 'असेही एकदा व्हावे' झलक

अवधूतच्या शास्त्रीय संगिताची 'असेही एकदा व्हावे' झलक

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्तेची गाणी म्हंटली कि 'पॉप' संगीतप्रकार डोळ्यांसमोर येतो. मात्र, एकदा तरी अवधूतने शास्त्रीय संगीत सादर करावे, हि त्याच्या चाहत्यांची इच्छा आता लवकरचपूर्ण होणार आहे. कारण, झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या आगामी सिनेमात अवधूतने आपल्या संगितातील विविध तीन जॉनर खास आपल्या चाहत्यांसाठीसादर केल्या आहेत. येत्या ६ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमामध्ये अवधूतने, एक रॉमेंटिक सॉंग, गझल आणि ठुमरी संगीतबद्ध केली असल्यामुळे, अवधूतचे गाणे म्हणजे 'पॉप' संगीतप्रकार, हि व्याख्या आता मोडीत निघणार आहे.

'असेही एकदा व्हावे' या सिनेमात त्याने दिलेल्या या विविध जॉनरच्या संगिताबद्दल बोलताना अवधूत असे बोलतो कि, ' आतापर्यंत अनेकांनी माझ्याकडे दहीहंडी, गणेशोत्सवात आवाज करणाऱ्या गाण्यांचीमागणी केली होती. त्यामुळे शास्त्रीय गाण्याला संगीत देण्याची संधीच मला कधी मिळाली नाही. मी शास्त्रीय संगीतदेखील करू शकतो, हे मला लोकांना सांगायचे होते. योगायोगाने सुश्रुत भागवतच्यासिनेमातील गाण्यांबद्दल मला विचारणा झाली, आणि या संधीचे सोने करायचे मी ठरवले'.

उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमातील अवधूतने संगीतबद्ध केलेले आणि त्याच्याच आवाजातील 'भेटते ती अशी' हे रॉमेंटिक साँँग प्रेक्षकांना आवडत आहे. वैभव जोशीलिखित हे गाणे जेव्हा अवधूतकडे आले तेव्हा, शब्दसंग्रहाने परिपूर्ण असलेल्या या कवितेला चाल देण्याचा मोह मला आवरता आला नसल्याचे तो सांगतो. शिवाय या सिनेमातील 'सावरे रंग मे' ही ठुमरी आणि  'किती बोलतो आपण दोघे' ही गजलदेखील अवधूतच्या सांगितीक छटांची झलक लोकांसमोर मांडतात. या सिनेमातील 'सावरे रंग मे' या ठुमरी संगीतासाठी दिग्दर्शक सुश्रुत भागवत अवधूतबद्दल थोडे साशंकहोते. मात्र, अवधूतने त्यांना विश्वासात घेत, ठुमरीच्या अनेक रचना त्यांच्यासमोर मांडल्या. त्यातील यमन रागात असलेली ठुमरी सुश्रुत यांना आवडली. सावनी शेंडे हिच्या आवाजातील समीर सामंत लिखित हिठुमरी श्रोत्यांसाठी पर्वणीच ठरत असून, वैभव जोशी लिखित 'किती बोलतो आपण दोघे' कीर्ती किल्लेदार हिच्या आवाजातील सुरेल गजलदेखील श्रवणीय आहे.  यापूर्वी अवधूतने वैशाली सामंतने गायलेली एकगजल संगीतबद्ध केली होती, त्यामुळे, बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा गजल संगीतावर हात फिरवण्याची संधी त्याला या सिनेमाच्या निमित्ताने मिळाली.

अशाप्रकारे अवधूतमय झालेल्या 'असेही एकदा व्हावे' सिनेमातील सर्व गाणी संगीतप्रेमींसाठी सुरेल मैफील ठरणार आहे. शिवाय उमेश कामत आणि तेजश्री प्रधान या जोडगोळीची  'यु नो व्हॉट' हीकवितादेखील प्रेक्षकांना मोहिनी घालण्यात यशस्वी ठरत आहे. ह्या कवितेला अद्वैत पटवर्धन यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. यासाठी उमेशने खास अद्वैत पटवर्धनकडून गिटारचे प्रशिक्षण घेतले आहे.

उमेश-तेजश्रीला पहिल्यांदाच एकत्र आणणाऱ्या या सिनेमाचे मधुकर रहाणे निर्माते असून त्यांचे मित्र रविंद्र शिंगणे यांचे बहुमूल्य सहकार्य यात लाभले आहे.शर्वाणी - सुश्रुत लिखित ह्या कथा पटकथेतमनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी मिळणार आहे.  या सिनेमात शर्वाणी पिल्लई, डॉ. निखित राजेशिर्के, चिराग पाटील, नारायण जाधव, कविता लाड आणि अजित भुरे हे कलाकारदेखील आपापल्या प्रमुखभूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे दर्जेदार कथानक, दिग्दर्शन आणि अनुभवी कलाकारांच्या मांदियाळीत सजलेला हा सिनेमा मनोरंजनासोबतच संगिताची सुरेल सफरदेखील प्रेक्षकांना करून देणार, हे निश्चित !

Web Title: Avadhuta's classical music should be 'Once upon a time'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.