अवधूत गुप्ते म्हणतो, ख्रिसमस टाइम....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 11:07 IST2016-12-21T11:05:34+5:302016-12-21T11:07:35+5:30
ख्रिसमस सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सामान्य व्यक्तीसहित सर्व कलाकारदेखील ख्रिसमसच्या सण साजरा करण्यासाठी उत्सुक दिसत असल्याचे ...

अवधूत गुप्ते म्हणतो, ख्रिसमस टाइम....
्रिसमस सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सामान्य व्यक्तीसहित सर्व कलाकारदेखील ख्रिसमसच्या सण साजरा करण्यासाठी उत्सुक दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण जगदेखील ख्रिसमस उत्सावाच्या तयारीला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. सगळीकडे जागोजागी चर्च हे लाइटच्या माळांनी चमकत आहे. त्याचप्रमाणे ख्रिसमस ट्रीदेखील अत्यंत सुंदररीत्या सजविले आहे. असे हे लखलखणारे ख्रिसमस ट्री पाहून फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. अशाच ख्रिसमस ट्रीच्या प्रेमात प्रेक्षकांचा लाडका कलाकार अवधूत गुप्ते पडला असल्याचे दिसत आहे. अवधूतने सोशलमीडियावर ख्रिसमस ट्रीसोबतचा एक झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत आहे. त्याचसोबत त्याने कॅरल सिंगिंग आपल्या फोटोवर लिहित ख्रिसमसचा उत्सव ही साजरा केला आहे. तसेच त्याच्या या फोटोला भरभरून कमेंन्टस मिळताना दिसत आहे. अवधूतने नेहमीच आपल्या अभिनयाने, संगीत, दिग्दर्शन आणि त्याच्या सुरेख आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तसेच त्याने खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाने सुत्रसंचालकाची भूमिका अत्यंत उत्तमरीत्या पार पाडली आहे. त्याच्या या सुत्रसंचालनाचे कौतुक आज ही प्रेक्षक करताना दिसत आहेत. त्याने एक तारा, मोरय्या, झेंडा असे अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्याचप्रमाणे त्याने काही चित्रपटांतून निर्मात्याची जबाबदारीदेखील पार पाडली आहे. त्याचप्रमाणे त्याने एक तारा आणि झेंडा या चित्रपटाचे लिखाणदेखील केले आहे. असे अनेक कला अंगी असणारा कलाकाराचे कौतुक नेहमीच सोशलमीडियावर पाहायला मिळत असते. आता अवधूत त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागले असल्याचे दिसत आहे. ए असे या चित्रपटाचे नाव आहे. या त्याच्या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.