​ संदीप उडवणार प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 12:21 IST2016-12-03T12:21:45+5:302016-12-03T12:21:45+5:30

अभिनेता संदीप पाठकने नेहमीच त्याच्या खट्याळ अभिनयामुळे प्रेक्षकांना मनसोक्त हसविले आहे. संदीपचा कॉमिक टायमींग देखील चांगला आहे. आज एक ...

The audience's heartbreaking flurry will blow up Sandeep | ​ संदीप उडवणार प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप

​ संदीप उडवणार प्रेक्षकांच्या मनाचा थरकाप

िनेता संदीप पाठकने नेहमीच त्याच्या खट्याळ अभिनयामुळे प्रेक्षकांना मनसोक्त हसविले आहे. संदीपचा कॉमिक टायमींग देखील चांगला आहे. आज एक विनोदी नट म्हणून त्याची चित्रपटसृष्टीत ओळख आहे. तर आता ही ओळख बदलणार असून संदीप एका आगळ््या-वेगळ््या भूमिकेत प्रेक्षकांचा थरकाप उडवायला सज्ज झाला आहे. तथास्तु या मराठीतल्या पहिल्या सायलेंट थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करीत वेगळा प्रयत्न करण्याचे धाडस झी टॉकीजने केलं आहे. झी टॉकीज व फिल्म पॉझिटीव्ही यांनी एकत्रित या सिनेमाची निर्मिती केली आहे. Þतथास्तुÞ चित्रपट शनिवार३ डिसेंबर आणि रविवार ४ डिसेंबरला रात्री १० वाजता झी टॉकीजवर प्रसारीत करण्यात येणार आहे. तथास्तु हा सायलेंट थ्रिलर चित्रपट असल्याने यात कोणताही शब्द- संवाद अथवा वाक्य नाही, कलाकारांचा आवाज नाही. त्यामुळे अर्थातच कलाकार म्हणून एक चॅलेंजिंग भूमिका वाट्याला आल्याचे समाधान मिळाल्याचे मनोगत संदीप पाठक यांनी यानिमित्ताने व्यक्त केले. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच सायलेंट थ्रिलर सिनेमाची झी टॉकीजने निर्मिती केली व त्याचा एक भाग असल्याचा आनंद देखील आपल्यासाठी तितकाच महत्त्वपूर्ण असल्याचे संदीप यांनी आवर्जून सांगितले. संदीप एका विक्षिप्त व्यक्तीरेखेत दिसणार आहे; तथास्तुचे दिग्दर्शन साहिल अभय तांडेल या युवा दिग्दर्शकाने केले असून गौरव पोंक्षे यांनी छायादिग्दर्शन केलं आहे. तथास्तु चित्रपटाची संकल्पना या दोघांची असून झी टॉकीजने ही कन्सेप्ट आवडल्यामुळे या नवख्या टीमला पाठिंबा देत चित्रपटाची निर्मिती करण्याचे धाडस केलंय. संदीप पाठक यांच्यासोबत माधवी निमकरची देखील वेगळ्या शैलीतील भूमिका पहायला मिळणार आहे. तथास्तु या मूकपटाची निर्मिती करून मनोरंजन विश्वात झी टॉकीज ही वाहिनी नवा ट्रेण्ड निर्माण करेल असा विश्वास संदीप पाठक यांनी व्यक्त केला. भूतकाळातील अनेक गोष्टींचे परिणाम आपल्याला भविष्यकाळात भोगावे लागतात या कथासूत्रावर तथास्तु चित्रपट आधारित आहे.

Web Title: The audience's heartbreaking flurry will blow up Sandeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.