​नगरसेवक या चित्रपटातील हळदी गीताला प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 14:21 IST2017-03-27T08:51:32+5:302017-03-27T14:21:32+5:30

‘जश पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक’ हा चित्रपट ३१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा ...

The audience chooses to sing a hiladi song from a corporator | ​नगरसेवक या चित्रपटातील हळदी गीताला प्रेक्षकांची पसंती

​नगरसेवक या चित्रपटातील हळदी गीताला प्रेक्षकांची पसंती

श पिक्चर्स’ प्रस्तुत शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी निर्मित ‘नगरसेवक’ हा चित्रपट ३१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी या चित्रपटाच्या गीतांना रसिकांची जोरदार पसंती मिळत आहे. ‘नगरसेवक’ चित्रपटात आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी गायलेले ‘हळद लागली’ हे हळदी गीत अल्पावधीत सुपरहिट ठरले असून टीव्ही, रेडिओ आणि समारंभामध्ये हे गीत चांगलेच गाजत आहे. सोशल मीडियावर अकरा लाखांहून अधिक लोकांची पसंती या गीताला मिळाली आहे. गीतकार बिपीन धायगुडे आणि अभिजित कुलकर्णी लिखित या गीताला संगीतकार देव-आशिष यांनी संगीत दिले आहे.
दिपक कदम दिग्दर्शित ‘नगरसेवक’ या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, अभिजीत कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयुरी देशमुख या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘झी म्युझिक’ने ‘नगरसेवक’ची ध्वनिफीत प्रकाशित केली आहे. हे गीत तुम्ही https://www.youtube.com/watch या लिंकवर ऐकू शकता.
नगरसेवक हा चित्रपट नावावरून राजकीयपट वाटत असला तरी तो चित्रपट राजकीय विषयावरचा नसल्याचे उपेंद्र लिमयेने नुकतेच म्हटले आहे. तो या चित्रपटाविषयी सांगतो, "या चित्रपटाची कथा ही अजिबातच राजकीय नाहीये. एका सामान्य कार्यकर्त्याचा नगरसेवक बनण्याचा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा एक कमर्शिअल सिनेमा असून यात मारामारी, रोमँटिक साँग सगळे काही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे." 
नगरसेवक या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच प्रेक्षकांना नेहा पेंडसे आणि उपेंद्र लिमये यांची जोडी पाहायला मिळणार आहे.



 

Web Title: The audience chooses to sing a hiladi song from a corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.