अॅटमगिरी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 15:07 IST2017-05-11T09:37:58+5:302017-05-11T15:07:58+5:30
कोवळ्या वयातील प्रेमकथा आपण आतापर्यंत टाइमपास, सैराट यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे आणि आतापर्यंत हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर ...

अॅटमगिरी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस
क वळ्या वयातील प्रेमकथा आपण आतापर्यंत टाइमपास, सैराट यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे आणि आतापर्यंत हे सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. अशाच कोवळ्या वयातील प्रेमकथा सांगणारा अॅटमगिरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच झाला. या ट्रेलरला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शालेय वयातील जोडप्याची प्रेमकथा प्रेक्षकांना या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
ए.आर.व्ही प्रोडक्शन आणि अविराज प्रोडक्शन यांची संयुक्त निर्मिती असलेल्या अॅटमगिरी या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना हंसराज जगताप प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. हंसराजला धग या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर या चित्रपटात राजेश्वरी खरात त्याच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. राजेश्वरीने फँड्री या चित्रपटात काम केले होते. तिच्या अभिनयाचे सगळ्यांनी कौतुक केले होते. याशिवाय अॅटमगिरी या चित्रपटात छाया कदम, रामचंद्र धुमाळ, धनश्री मेश्राम, अमित तावरे, सुरज टक्के आणि मिलिंद शिंदे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अॅटमगिरी या चित्रपटातील गाण्यांवर चित्रपटाच्या टीमने खूपच मेहनत घेतली आहे. ही गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटाला रोहित नागभिडे आणि शंकर पवार यांनी संगीत दिले असून या चित्रपटातील गाणी आर्या आंबेकर, आदर्श शिंदे, शंकर पवार, प्रेम कोतवाल यांनी गायली आहेत. या चित्रपटात एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असली तरी प्रेक्षकांना या चित्रपटाद्वारे एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.