आशा भोसलेंनी बाबुजींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा, 'स्वरगंधर्व सुधीर फडके'ला दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:58 PM2024-04-11T12:58:10+5:302024-04-11T12:58:40+5:30

Aasha Bhosle : आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी बाबुजींसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

Asha Bhosle reminisced about her memories with Babuji, wished 'Swargandharva Sudhir Phadke' | आशा भोसलेंनी बाबुजींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा, 'स्वरगंधर्व सुधीर फडके'ला दिल्या शुभेच्छा

आशा भोसलेंनी बाबुजींसोबतच्या आठवणींना दिला उजाळा, 'स्वरगंधर्व सुधीर फडके'ला दिल्या शुभेच्छा

मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके (Swargandharva Sudhir Phadke). म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. दरम्यान प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी बाबुजींसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. 

बाबुजी आणि आशाबाईंनी कायमच आपल्या प्रतिभेची चमक दाखवली आहे. त्यांच्या स्वर्गीय सुरांनी नटलेल्या प्रत्येक गाण्याला लाभलेली लोकप्रियता अवर्णनीय आहे. या दोघांनी गायलेली सगळीच गाणी ऐकताना त्या कलाकृतीच्या अलौकिकतेचा प्रत्यय येतो. ही गाणी सदाबहार असून 'जगाच्या पाठीवर', 'या सुखांनो या', 'धाकटी बहीण', 'लाखाची गोष्ट', 'सुवासिनी', 'लक्ष्मीची पाऊले' अशा अनेक चित्रपटांतील गाण्यांना या जोडीचा आवाज लाभला आहे. ही सगळीच गाणी अजरामर आहेत. 

ते माझे गुरूच आहेत
आशा भोसले बाबुजींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले की, बाबुजी म्हणजे एक अष्टपैलू आणि कलासक्त कलाकार. 'का रे दुरावा...' चा एक गमतीदार किस्सा म्हणजे. हे गाणे गाताना 'का रे दुरावा... ही ओळ गाताना बाबुजींनी मला खूपच हावभाव व्यक्त करण्यास सांगितले. परंतु हे करताना मला खूप हसायला येत होते. मी असे हावभाव दिले तर लोक वेडे म्हणतील मला. त्यावर त्यांचे उत्तर होते, नाही.. नाही... चांगलं म्हणतील. अशा पद्धतीने ते गाणं शिकवायचे. त्यामुळे आम्ही समृद्ध होत गेलो. मी बाबुजींना खूप मानते, ते माझे गुरूच आहेत. त्यांची आयुष्यगाथा सांगणारा चित्रपट येतोय. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद.'' 

सिनेमात दिसणार हे कलाकार 
सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Asha Bhosle reminisced about her memories with Babuji, wished 'Swargandharva Sudhir Phadke'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.