अरुण नलावडे दिग्दर्शकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 18:36 IST2017-03-29T13:06:02+5:302017-03-29T18:36:02+5:30

दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसावं ही महत्वाकांक्षा प्रत्येक रंगकर्मीला असतेच. खूप कमी जण या स्वप्नांचा पाठलाग करीत ‘कॅप्टन ऑफ द शिप’ ...

Arun Nalawade plays the role of director | अरुण नलावडे दिग्दर्शकाच्या भूमिकेत

अरुण नलावडे दिग्दर्शकाच्या भूमिकेत

ग्दर्शकाच्या खुर्चीत बसावं ही महत्वाकांक्षा प्रत्येक रंगकर्मीला असतेच. खूप कमी जण या स्वप्नांचा पाठलाग करीत ‘कॅप्टन ऑफ द शिप’ होतात. नाटक, मालिका व चित्रपट अशा तीनही माध्यमांत लिलया वावर असणारे हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केवळ अभिनयापुरते सीमित न राहता दिग्दर्शनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाचा अनोखा पैलू ‘शरयु आर्ट प्रॉडक्शन’ निर्मित ‘ताटवा’ या आगामी मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अरुण नलावडे ‘ताटवा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत यात शिल्पकाराची वेगळी भूमिका साकारताहेत; त्यामुळे ते प्रेक्षकांना अभिनेता व दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत दिसतील.डॉ. शरयु पाझारे निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाची कथा समाजातील विषमतेवर भाष्य करीत, पाथरवट समाजातील होतकरू मुलीचा जीवनप्रवास रेखाटणारी आहे. या मुलीला शिल्पकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पकाराच्या भूमिकेत अरुणजी दिसतील. संजय शेजवळ व गौरी कोंगे ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करतेय. अरुण नलावडे यांनी चित्रपटाविषयी आपले मनोगत मांडले कि, सुरुवातीला मी या चित्रपटात फक्त अभिनय करणार होतो; परंतु निर्मात्या डॉ. शरयु पाझारे यांनी, ‘तुम्हीच या सिनेमाचे दिग्दर्शन करणार का?’ असे विचारले. विषयात नाविन्य असल्याने मी ‘ताटवा’चे दिग्दर्शन करण्यास होकार दिला. ‘ताटवा’ म्हणजे कुंपण भेदून जाणे’, शीर्षकाप्रमाणे या चित्रपटात पाथरवट समाजातील मुलगी तिच्या हुशारीने पुढे जात समाजासाठी आदर्श निर्माण करते. मनाशी ठरवलं तर एखादी व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते असा प्रेरणादायी संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. ‘ताटवा’ चित्रपटाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे अनेक स्थानिक कलाकारांनी यात भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात अभिनयासोबत दिग्दर्शनाचा अनुभव खूप छान होता, अशा शब्दात अरुण नलावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.व्यक्तीरेखा छोटी असो वा मोठी, भूमिकेत वेगळेपण आणून ती लक्षवेधी करण्यात अरुणजींची ख्याती आहे. आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अरुण नलावडे यांच्या दिग्दर्शकीय भूमिकेचे प्रेक्षक नक्की स्वागत करतील.

Web Title: Arun Nalawade plays the role of director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.