आगामी राजकीय थ्रिलर 'मायानगरी' सिटी ऑफ ड्रीम्समध्ये झळकणार हे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:51 IST2018-05-11T09:21:33+5:302018-05-11T14:51:33+5:30

आदित्य बिर्ला समुहाच्या अॅपलॉज एण्टरटेन्मेंट या कण्टेण्ट स्टुडिओने आजवर देशातल्या प्रसिद्ध कलाकारांसोबत भागीदारी करून अनेक डिजिटल कार्यामांची निर्मिती केली ...

The artist will be seen in upcoming political thriller 'City of Dreams' | आगामी राजकीय थ्रिलर 'मायानगरी' सिटी ऑफ ड्रीम्समध्ये झळकणार हे कलाकार

आगामी राजकीय थ्रिलर 'मायानगरी' सिटी ऑफ ड्रीम्समध्ये झळकणार हे कलाकार

ित्य बिर्ला समुहाच्या अॅपलॉज एण्टरटेन्मेंट या कण्टेण्ट स्टुडिओने आजवर देशातल्या प्रसिद्ध कलाकारांसोबत भागीदारी करून अनेक डिजिटल कार्यामांची निर्मिती केली आहे. आता, अॅपलॉज 'मायानगरी' #CityOfDreams ही राजकीय थ्रिलर सिरीज दमदार कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे.समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजचे १० भाग प्रदर्शित होणार आहेत.यामध्ये सचिन पिळगांवर आणि प्रिया बापट मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.'मायानगरी' #CityOfDreams  ही कथा मुंबईतील तीन प्रकारचे सामाजिक स्तर- अत्यंत गरीब, मध्यमवर्ग आणि अतिश्रीमंत- यावर परिणाम करणार्‍या सत्तेची ताकद, भ्रष्टाचार आणि एकूण पर्यावरणावर परिणाम साधणार्‍या इथल्या सत्ताधारी राजकारणी मंडळी, भ्रष्टाचार आणि फसवणूक यावर भाष्य करते.गायकवाड घराण्यातील एका सदस्याच्या हत्येचा प्रयत्न झाल्यानंतर या कुटुंबात उसळलेल्या भांडणाची ही कथा आहे.

Also Read:प्रिया बापट साकारणार पौर्णिमा गायकवाड,नागेश कुकूनुरच्या मायानगरीत झळकणार


अॅपलॉज एण्टरटेन्मेंटचे सीईओ समीर नायर म्हणाले, 'मायानगरी' #CityOfDreams या कथेलाच तगड्या कलाकारांची गरज होती आणि इतके गुणी कलाकार आम्हाला लाभले, याबाबत आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो.प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेत शिरून काम करतो आणि आपापले पात्र ताकदीनिशी वठवताना प्रत्येकामध्ये एक उत्साह असतो. आपले आवडते कलाकार या सिरीजमध्ये नव्या अवतारात पाहताना प्रेक्षकांना आनंद होईल, याची मला खात्री आहे.सचिन पिळगावकर म्हणाले, 'मायानगरी' #CityOfDreams या सिरीजच्या कथेशी मी स्वतःला लगेच रिलेट करू शकलो. या सिरीजमध्ये काम करायला मी तयार होण्यामागचे हेच मुख्य कारण आहे. नागेश हा एक अद्वितीय फोकस्ड दिग्दर्शक आहे आणि समीरलाही या क्षेत्रातली चांगली जाण आहे. या दोघांसोबत काम करण्याची मला संधी मिळाल्याबद्दल मला फार अभिमान वाटतो आहे.अॅपलॉज एण्टरटेन्मेंटतर्फे नेहमीच आपल्या आगामी उत्तमोत्तम कार्यामांची घोषणा केली जाते. नागेशसारखे अद्वितीय दिग्दर्शक आणि तगडे कलाकार यांच्यासह मायानगरी #CityOfDreams ही सिरीज प्रेक्षकांसाठी नक्कीच एक मौल्यवान कलाकृती ठरेल.मायानगरी #CityOfDreams च्या स्ट्रिमिंगसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत.

Web Title: The artist will be seen in upcoming political thriller 'City of Dreams'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.