चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमणार?; अध्यक्षांवर पुन्हा अविश्वासाची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:12 AM2021-03-21T03:12:32+5:302021-03-21T07:06:47+5:30

कार्यकारिणीची मुदत मार्चअखेर संपत असून, तत्पूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक व्हावी लागते. या बैठकीत अहवाल सादर करून संचालकांची मान्यता घ्यावी लागते.

To appoint an administrator to the Film Corporation ?; The sword of disbelief hangs over the President again | चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमणार?; अध्यक्षांवर पुन्हा अविश्वासाची टांगती तलवार

चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमणार?; अध्यक्षांवर पुन्हा अविश्वासाची टांगती तलवार

googlenewsNext

इंदुमती गणेश

कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत आता संपल्याने महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठरावाची टांगती तलवार असल्याने कार्यकारिणीच्या अखेरच्या बैठकीची तारीखही जाहीर झालेली नाही.

कार्यकारिणीची मुदत मार्चअखेर संपत असून, तत्पूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक व्हावी लागते. या बैठकीत अहवाल सादर करून संचालकांची मान्यता घ्यावी लागते. त्यातच सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर केली जाते. या सभेत सभासदांच्या मान्यतेने निवडणूक जाहीर होते, मात्र यापैकी कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. महामंडळाची कोणतीही तयारी अजून नाही. कार्यकारिणी बैठक, सर्वसाधारण सभा, मतदार याद्या तयार करणे, या प्रक्रियेसाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागतो. संचालकांनी कार्यकारिणीच्या बैठकीची मागणी केली होती. 

धर्मादायकडे प्रशासकांची मागणी करणार
महामंडळाच्या जुन्या कार्यकारिणीतील १४ संचालकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यमान संचालकांचा समावेश आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये त्रुटी असून, तो संचालकांना न दाखवताच धर्मादायला सादर करण्यात आल्याची माहिती आहे. कार्यकारिणीची बैठकच झाली नाही, तर धर्मादाय आयुक्तांकडे प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात येणार आहे.

निवडणूक, मुदतवाढ किंवा प्रशासक
महामंडळाचे ३५ हजारांवर सभासद असून, ते राज्यभर आहेत, कार्यकारिणीची बैठक झाली, तर संचालकांनी राजीनामा देऊन प्रशासक आणायचा किंवा अध्यक्षांवर अविश्वासदर्शक ठराव आणून नव्या अध्यक्षांची नियुक्ती करून सहा महिने मुदतवाढ घ्यायची, यादृष्टीने मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या सभासदांच्या हालचाली सुरू आहेत.

Web Title: To appoint an administrator to the Film Corporation ?; The sword of disbelief hangs over the President again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.