फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२१च्या ६व्या पर्वाची घोषणा, सोनाली कुलकर्णीसह हे कलाकार करणार परफॉर्म

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 02:59 PM2022-03-25T14:59:45+5:302022-03-25T15:03:02+5:30

या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव करणार आहे.

Announcing the 6th edition of Filmfare Awards Marathi 2021, this artist will perform with Sonali Kulkarni | फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२१च्या ६व्या पर्वाची घोषणा, सोनाली कुलकर्णीसह हे कलाकार करणार परफॉर्म

फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२१च्या ६व्या पर्वाची घोषणा, सोनाली कुलकर्णीसह हे कलाकार करणार परफॉर्म

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम सादरीकरणांचा गौरव करण्यासाठी फिल्मफेअरतर्फे प्लॅनेट मराठी या शीर्षक प्रायोजकाच्या सहयोगाने 31 मार्च 2022 रोजी फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या 6व्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव करणार असून कित्येक पिढ्यांवर आपल्या आवाजाने गारुड केलेल्या लता मंगेशकर यांना पूजा सावंत आणि मानसी नायक या अभिनेत्री मानवंदना देतील.  लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील निवडक लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण या दोन स्टार गायिका करतील. त्याचप्रमाणे मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, वैभव तत्ववादी हे आपल्या कौशल्याने मनोरंजनाचा मापदंड एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील, तसेच अष्टपैलू अमृता खानविलकरचा खास परफॉरमन्स या सोहळ्यात असणार आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, "मराठी सिनेमाचा गौरव करण्यासाठी सोहळा आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम फिल्मफेअरचे अभिनंदन करते. गेली अनेक वर्षे फिल्मफेअर पुरस्कार मराठीने ही हवीहवीशी वाटणारी ब्लॅक लेडी मिळविण्यासाठी कलाकारांना आपले कौशल्य उंचावण्यासाठी प्रेरणा दिली. ज्या चित्रपटसृष्टीने जागतिक नकाशावर ठसा उमटवला आहे, अशा चित्रपटसृष्टीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या लोकप्रिय व भव्य सोहळ्याचा भाग झाल्याने मी रोमांचित झाले आहे."

Web Title: Announcing the 6th edition of Filmfare Awards Marathi 2021, this artist will perform with Sonali Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.