'सैराट' सिनेमातल्या झाडाची फांदी तुटल्यामुळे रसिक झाले नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2017 15:00 IST2017-01-17T14:57:58+5:302017-01-17T15:00:07+5:30
याड लागलं म्हणत सैराट सिनेमाने रसिकांना अक्षरशः याड लावल्याचे सा-यांनीच अनुभवलं. आता पुन्हा एकदा सैराटनेच रसिकांना याड लावल्याचे पाहायला ...
.jpg)
'सैराट' सिनेमातल्या झाडाची फांदी तुटल्यामुळे रसिक झाले नाराज
य ड लागलं म्हणत सैराट सिनेमाने रसिकांना अक्षरशः याड लावल्याचे सा-यांनीच अनुभवलं. आता पुन्हा एकदा सैराटनेच रसिकांना याड लावल्याचे पाहायला मिळतंय.होय, यावेळी सैराट सिनेमानी नाहीतर सैराट सिनेमातील झाडाच्या फांदीनेच सा-यांना याड लावल्याचे दिसतंय.सिनेमात ज्या झाडाच्या फांदीवर आर्ची बसलेली होती, नेमकी तीच फांदी तुटल्याने रसिक हळहळ व्यक्त करतायेत. पर्यटकांनी सतत झाडावर चढल्या-उतरल्यामुळे ही फांदी तुटल्याचं बोललं जात आहे.सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सना 'सैराट'
झाडानेच सैराट करून सोडल्याचे दिसतंय.अजय-अतुल यांच्या ‘सैराट झालं जी…’ या गाण्यामध्ये एका वाळलेल्या झाडाच्या फांदीवर बसून आर्ची आणि परश्या आपल्या प्रेमाची कबुली देत असल्याचे दाखवण्यात आले होते.करमाळ्यात असणा-या या झाडावर या गाण्यातला काही भाग चित्रित करण्यात आला होता. सिनेमाप्रमाणेच हे झाडही खूप लोकप्रिय झाले . 'सैराट' सिनेमानंतर हे झाड ‘सेल्फी पॉईंट’ही बनले, इतकेच नाहीतर या झाडाला ‘सैराट झाड’ म्हणूनही ओळखले जाते.