आणि महेश काळेच्या गायनावर लोक झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 15:57 IST2017-12-23T10:27:51+5:302017-12-23T15:57:51+5:30
महेश काळेने नुकतीच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला हजेरी लावली होती. त्याने तिथे सादर केलेल्या गाण्यावर लोक अक्षरशः फिदा झाले होते.
(1).jpg)
आणि महेश काळेच्या गायनावर लोक झाले फिदा
क ्यार काळजात घुसली या सिनेमामुळे प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळेने पार्श्वगायक म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली. शास्त्रीय संगीतामधील महेश काळे हे खूपच महत्त्वाचे नाव म्हटले जाते. कट्यार काळजात घुसली या सिनेमातील गायनासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. कट्यारच्या यशानंतर गायक म्हणून महेशनं मराठी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे विविध संगीत रिअॅलिटी शोमध्येही परीक्षकाच्या भूमिकेतही तो झळकला आहे. सध्या सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात महेश परीक्षकाची भूमिका बजावत आहे. महेशने नुकत्याच एका महोत्सवाला हजेरी लावली होती. तिथे त्याला खूप चांगला अनुभव आला असल्याचे त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर या महोत्सवातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या त्याच्या व्हिडिओला २६ हजाराहून अधिक व्हयूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडिओच्या खाली अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गानसेनांप्रमाणेच कानसेनांसारख्या दर्दी रसिकांचे प्रेम मिळणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' दरवर्षी आयोजित केला जातो. या महोत्सवाला नुकताच महेश उपस्थित राहिला होता. महेशच्या गायनानेच या महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात झाली होती.
'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' हा अतिशय प्रसिद्ध महोत्सव मानला जातो. त्यामुळे नेहमीच लोक प्रचंड संख्येने या महोत्सवास गर्दी करतात. या वर्षी देखील या महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली होती. लोकांची संख्या प्रचंड असल्याने अनेकांना तिकिटे देखील मिळाली नसल्याने त्यांची निराशा झाली होती. सुमारे १५,००० प्रेक्षकांसमोर गाण्याचा अनुभव विस्मरणीय असल्याचा महेश काळेने खास संदेश फेसबुक पोस्टवर लिहिला आहे. अभिजात शास्त्रीय संगीतामध्येही आधुनिकता जपणारा आणि प्रेक्षकांची नस ओळखून गाणार्या महेश काळेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सादरीकरणानंतर त्याला रसिकांनी स्टॅन्डिंग ओव्हेशन देखील दिले. या प्रेमाला शब्दात व्यक्त करणं कठीण असल्याचे महेशने सांगितले आहे. इतक्या मोठ्या प्रेक्षकांसमोर गाणं सादर करण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना त्याने या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.