अध्यक्ष महोदय amu ला नॅशनल क्रश म्हणून घोषित करा, चाहत्याच्या कमेंटने वेधलं सगळ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 19:03 IST2021-12-16T18:59:47+5:302021-12-16T19:03:22+5:30
वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिक प्रेक्षकांचं मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिच्या हटके लुकनं चाहते अक्षरश: घायाळ होतात.

अध्यक्ष महोदय amu ला नॅशनल क्रश म्हणून घोषित करा, चाहत्याच्या कमेंटने वेधलं सगळ्यांचं लक्ष
‘वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिक प्रेक्षकांचं मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिच्या हटके लुकनं चाहते अक्षरश: घायाळ होतात. चेह-यावरचं मनमोहक हास्य आणि दिलखेच अदा पाहून तिच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात. अमृता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे नवनवीन फोटो ती शेअर करत असते. आता अमृताच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडणार नसेल तर नवल. अमृतानं फोटो शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. तूर्तास तिच्या अशाच फोटोंची चर्चा आहे. या फोटोंसोबत कमेंट्स बॉक्समधील कमेंट्स केल्या आहेत.
अमृताने तिच निळ्या रंगाच्या ड्रेसमधले फोटोशूट शेअर केलं आहे.ज्यात ती खूपच स्टनिंग दिसते आहे. अमृताच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यांच्या कमेंट्सने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अध्यक्ष महोदय amu ला नॅशनल क्रश म्हणून घोषित करा अशी कमेंट अमृताच्या फोटोवर केली आहे.
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीमधील फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये तिनं धमाकेदार काम केलं आहे.