अमेय करणार सुत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 14:22 IST2016-12-06T14:22:11+5:302016-12-06T14:22:11+5:30
अमेय वाघ प्रेक्षकांना आता लवकरच सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतेय. अमेयने अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सिरिज केल्या आहेत. ...

अमेय करणार सुत्रसंचालन
अ ेय वाघ प्रेक्षकांना आता लवकरच सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समजतेय. अमेयने अनेक चित्रपट, मालिका आणि वेब सिरिज केल्या आहेत. त्याने पुरस्कार सोहळ््याचे सुत्रसंचाल याआधी केले होते. परंतू तो आता टिव्ही वर सुत्रसंचालक म्हणुन समोर येणार असल्याचे कळतेय. सध्या अनेक शोज मध्ये आपल्याला मराठी कलाकार दिसत आहेत. चित्रपटांतून वेळ काढून हे कलाकार आता छोट्या पडदयाकडे वळले असल्याचे दिसतेय. अमेय देखील पुन्हा एकदा छोट्या पडदयावर येण्यास सज्ज झाला आहे. परंतू तो नक्की कोणत्या कार्यक्रमाचे अथवा रिअॅलिटी शोचे सुत्रसंचालन करणार हे मात्र काही अजुन तरी उलगडलेले नाही. परंतू त्याला सुत्रसंचालक म्हणुन पाहण्यास त्याचे चाहते मात्र नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही. आता अमेय कोणत्या अंदाजात सुत्रसंचालन करणार हे आपल्याला लवकरच समजेल. अमेयचा कॉमिक टायमींग देखील अफलातून आहे.