आता पुण्यातही हे राम.. नथुराम..! नाटकाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 12:17 IST2017-01-29T06:47:32+5:302017-01-29T12:17:32+5:30

सध्या हे राम.. नथुराम..! या नाटकाच्या प्रयोगाला अनेक ठिकाणी विरोध होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.  नुकतेच नागपूरमध्येदेखील या ...

This is also Ram in Pune .. Nathuram ..! Opposition to play | आता पुण्यातही हे राम.. नथुराम..! नाटकाला विरोध

आता पुण्यातही हे राम.. नथुराम..! नाटकाला विरोध

्या हे राम.. नथुराम..! या नाटकाच्या प्रयोगाला अनेक ठिकाणी विरोध होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.  नुकतेच नागपूरमध्येदेखील या नाटकाला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही दिवसांपूर्वी कोकण आणि मराठवाड्यात या नाटकाला जोरदार विरोध करण्यात आला होता. आता यानंतर पुण्यातही या नाटकाला विरोध करण्यात आला आहे.  

        पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहा बाहेर हे राम.. नथुराम.. या नाटकाचा प्रयोग होऊ नये म्हणून विरोध केला जात आहे. क्राँग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटनेने हा विरोध केला आहे. पण हा प्रयोग पूर्ण करण्याचा नाटकाच्या टीमचा प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे.  तसेच काही दिवसांपूर्वीच म्हणजे औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेनेच्या वतीने हे राम..नथुराम..! नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

            हे नाटक संत तुकाराम नाटयगृह एन- ५ सिडको येथे सादर करण्यात येणार होते. मात्र यावेळी स्वाभिमान आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाला विरोध करण्यास सुरुवात केली होती. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी त्यांच्या समर्थकांसह संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना चोप दिला होता.तसेच कोकणातील कणकवलीमध्येही हे राम..नथुराम..!च्या प्रयोगाला स्थानिक आमदार नितेश राणे यांनीही विरोध केला होता. यावर संतप्त झालेल्या नाटकाचे लेखक आणि निर्माते  शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता. आता पुण्यात ही या नाटकाच्या प्रयोगाला जोरदार विरोध होत आहे. पुण्यातील अण्णा भाऊ साठे या नाटयगृहाबाहेर कार्यकर्ते मोठया प्रमाणात नाटकाचे प्रयोग थांबविण्यासाठी निर्देशने करताना दिसत आहे. 

Web Title: This is also Ram in Pune .. Nathuram ..! Opposition to play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.