अलका कुबल यांची लेक चालली सासरला!, लग्नाचे सुंदर फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 17:11 IST2022-01-25T17:10:43+5:302022-01-25T17:11:34+5:30
अलका कुबल (Alka Kubal) यांनी नुकतेच इंस्टाग्राम या लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.

अलका कुबल यांची लेक चालली सासरला!, लग्नाचे सुंदर फोटो आले समोर
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांची थोरली मुलगी ईशानी नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. तिच्या लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तसेच नुकतेच अलका कुबल यांनी लेकीच्या लग्नात कॅमेऱ्यात टिपलेले खास क्षण इंस्टाग्रामवर फोटोंच्या माध्यमातून शेअर केले आहे.
अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना ईशानी आणि कस्तुरी या दोन मुली आहेत. नुकतेच त्यांची थोरली लेक ईशानीने दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्नबेडीत अडकली आहे. ईशानी आणि निशांतच्या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. नुकतेच अलका कुबल यांनी इंस्टाग्राम या लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ईशानी खूपच सुंदर दिसते आहे. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. तसेच फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
ईशानी वैमानिक असून तिच्यामध्ये लहानपणापासूनच जिद्द होती की, आपण काहीतरी वेगळे करायचे जे केल्याने तिची समाजात एक वेगळी ओळख निर्माण होईल. त्यामुळे तिने अभिनयाचे क्षेत्रात न येता वैमानिक बनायचा निश्चय केला. ईशानीने वैमानिक बनण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तिने शिक्षण घेत असताना खूप मेहनत घेतली आणि तिला तिच्या मेहनतीचे फळही मिळाले. त्यानंतर तिला व्यावसायिक विमान चालवण्यासाठी लायसन्स देखील मिळाले आहे.