डोहाळ जेवणाचा कार्यक्रमात अक्षय वाघमारेने केला पत्नीसह झिंगाट डान्स, व्हिडिओ प्रचंड होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 12:46 PM2021-03-25T12:46:11+5:302021-03-25T12:47:40+5:30

Akshay waghmare's unique way of celebration for babyshower,अक्षयसोबत पत्नी योगीताने देखील ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. हे कपल बाळाच्या आगमनाची किती आतुरतेने वाट पाहात आहेत याचीच प्रचीती या व्हिडिओवरून येते आहे.

Akshay waghmare dance on झिंगाट साँग with Wife Yogita in baby shower function Video viral | डोहाळ जेवणाचा कार्यक्रमात अक्षय वाघमारेने केला पत्नीसह झिंगाट डान्स, व्हिडिओ प्रचंड होतोय व्हायरल

डोहाळ जेवणाचा कार्यक्रमात अक्षय वाघमारेने केला पत्नीसह झिंगाट डान्स, व्हिडिओ प्रचंड होतोय व्हायरल

googlenewsNext

गेल्या वर्षीच अभिनेता अक्षय वाघमारेचे योगिता गवळी सह लग्न झाले होते. दगडी चाळीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता. योगिता आणि अक्षयचा विवाहसोहळा हा अतिशय साधेपद्धतीने करण्यात आला. आता या कपालच्या आयुष्यात बाळाचे आगमन होणार आहे.

अभिनेता अक्षय वाघमारे  बाबा होणार आहे. योगिताचा नुकतेच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. डोहाळे जेवणाचा व्हिडीओ अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून व्हिडीओ भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.

शेअर केलेल्या व्हिडिओत अक्षय झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे अक्षयसोबत पत्नी योगीताने देखील ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. हे कपल बाळाच्या आगमनाची किती आतुरतेने वाट पाहात आहेत याचीच प्रचीती या व्हिडिओवरून येते आहे.


अक्षय वाघमारे मराठी सिनेमात काम करत असून योगिता पेश्याने वकिल असून एक संस्था चालवते. काही वर्षांपासून योगिता आणि अक्षय एकमेकांना ओळखत असून अक्षय आणि महेश योगिताचा भाऊ हे दोघे खूप चांगल मित्र आहेत.

Web Title: Akshay waghmare dance on झिंगाट साँग with Wife Yogita in baby shower function Video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.