अजित पवार यांनी दिला अभिनय सावंतची प्रमुख भूमिका असलेल्या थापाड्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 14:19 IST2017-10-04T08:49:16+5:302017-10-04T14:19:16+5:30

थापाड्या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप अजित पवार यांनी दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ...

Ajit Pawar gave the key role of acting. | अजित पवार यांनी दिला अभिनय सावंतची प्रमुख भूमिका असलेल्या थापाड्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप

अजित पवार यांनी दिला अभिनय सावंतची प्रमुख भूमिका असलेल्या थापाड्या या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप

पाड्या या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप अजित पवार यांनी दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी या क्षेत्रापासून थोडा लांबच राहिलो. पण आज दिग्दर्शक अजित शिरोळे यांच्यामुळे मी जीवनात पहिल्यांदाच चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला आणि तो ही ‘थापाड्या’ सारखा नावाच्या चित्रपटाला. त्यामुळे काही लोकांच्या मनात प्रश्न येणे साहजिकच आहे. मात्र गेल्या तीन-साडेतीन वर्षापासून आपण सगळेच बघतो आहोत की कशा प्रकारे थापा चाललेल्या असून लोकांना बनवण्याचे काम सुरू आहे. कदाचित त्याच्यातूनच भाऊसाहेबांना या चित्रपटाचे नाव ‘थापाड्या’ असे सुचले असावे. मी जरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी मी त्या भूमिकेतून हे बोलत नसून आता सहनशीलतेचा अंत झाला आहे असे मला वाटते. पण आता लोकांना जाणवू लागले आहे की, हे फसवण्याचे काम सुरू आहे. त्यावेळेस मग कोणीही असले तरी लोक गप्प बसत नाहीत आणि म्हणूनच या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव समर्पक आहे असा माझा कयास आहे. तो कदाचित चुकीचा असेल कदाचित बरोबर असेल.” 
निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी मनोगत मांडताना सांगितले, “या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव देणे कसे सुचले असे मला अनेकजण विचारत आहेत. त्यांना मी आवर्जून सांगेन, आज काल या नावाला बरे दिवस आल्याने हेच नाव देण्याचे मी ठरवले. आम्ही मानसी फिल्म प्रॉडक्शनच्या वतीने ज्यांना कोणतीही चित्रपटाची पार्श्वभूमी नाही अशा कलाकारांना संधी देऊन नवीन कलाकार घडवण्याचे कार्य करत आहोत.”
या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळी अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड या तीन कलाकारांनी एक स्कीट सादर केले. या मुहूर्ताच्या प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, निर्मात्या संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, निर्माते भाऊसाहेब भोईर, शरद मस्के आणि इतर मान्यवर हजर होते. 
मुसळेने “थाप मारुनी थापाड्या गेला” ही लावणी सादर करत उपस्थितांचे मन जिंकले.

Web Title: Ajit Pawar gave the key role of acting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.