ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा दाक्षिणात्य गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 06:59 PM2023-07-22T18:59:28+5:302023-07-22T18:59:50+5:30

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा भन्नाट डान्स पाहिलात का?

aishwarya narkar avinash narkar dance on south indian kavala song video viral | ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा दाक्षिणात्य गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा दाक्षिणात्य गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. ऐश्वर्या-अविनाश या जोडीकडे कलाविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक दशकं ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. ऐन साठीतही ऐश्वर्या आणि अविनाश त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. सध्या या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ऐश्वर्या कित्येकदा त्यांचे फोटो शेअर करताना दिसतात. तर अविनाश नारकर यांचे अनेक रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता अविनाश नारकर यांनी ऐश्वर्या यांच्याबरोबर रील बनवला आहे. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन हा रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघेही दाक्षिणात्य गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या रीलमधील दोघांची एनर्जी पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. “त्यांची एनर्जी मॅच करण्याचा प्रयत्न करत आहे,” असं कॅप्शन देत ऐश्वर्या यांनी हा रील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

अमृता देशमुख-प्रसाद जवादेने गुपचूप उरकला साखरपुडा, अभिनेत्रीचा भाऊ कमेंट करत म्हणाला...

“इर्शाळवाडीशी माझा खूप जवळचा संबंध आहे”, जुई गडकरी भावुक, म्हणाली, “मी गेल्याच वर्षी...”

दरम्यान, ऐश्वर्या नारकर या सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. तर अविनाश नारकर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फकाट’ सिनेमात दिसले होते.

Web Title: aishwarya narkar avinash narkar dance on south indian kavala song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.