​ क्रांती रेडकर चढणार बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:55 IST2017-01-13T14:49:16+5:302017-01-13T14:55:33+5:30

आपल्या दिलखेचक नृत्याच्या अदाकारीने अभिनेत्री क्रांती रेडकरने तमाम प्रेक्षकांना घायाळ केले आहे. कोंबडी पळाली तंगडी धरुन या क्रांतीच्या गाण्याने ...

After the Revolution Revolution is going to rise | ​ क्रांती रेडकर चढणार बोहल्यावर

​ क्रांती रेडकर चढणार बोहल्यावर

ल्या दिलखेचक नृत्याच्या अदाकारीने अभिनेत्री क्रांती रेडकरने तमाम प्रेक्षकांना घायाळ केले आहे. कोंबडी पळाली तंगडी धरुन या क्रांतीच्या गाण्याने तर सगळीकडे धुमाकुळ घातला होता. हे गाणे त्यावेळी चांगलेच गाजले आणि क्रांती रेडकर खºया अर्थाने जत्रा चित्रपटाच्या नंतर प्रकाश झोतात आली. परंतू आता मराठी इंडस्ट्रीतील ही बबली गर्ल लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे कळतेय.होय, क्रांती रेडकरने यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजतेय. अहो , असे आम्ही सांगत नाही तर खुदद क्रांतीने या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. यावर्षी तिने लग्न करण्याचा करार केल्याचे समजतेय. एका चाहत्याने क्रांतीला तु यावर्षी काय कररा केले आहेस असे विचारले असता ती म्हणाली, मी स्वत:शी तीन करार केले आहे. यात पहिला करार म्हणजे मला स्वत:चा पेहराव बदलायचा असून जास्तीत जास्त साड्या नेसण्यावर यंदा भर द्यायचा आहे. दुसरा करार म्हणजे या वर्षात एकातरी चित्रपटाची संहिता लिहून पूर्ण करणाराचा माझा विचार आहे.तर क्रांतीचा तिसरा करार हा तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट ठरणार आहे. तर काही चाहत्यांचे नक्कीच हार्ट ब्रेक होणार आहे. आपल्या तिस-या कराराविषयी सांगताना क्रांती म्हणाली की, या वर्षात मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ती कोणाशी लग्न करणार हे तर तिने गुपितच ठेवलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत सनई-चौघड्यांचे सुर घुमू लागणार एवढे खरे. 

Web Title: After the Revolution Revolution is going to rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.