अखेर त्याचा लुक उलगडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 09:44 IST2016-11-29T18:14:17+5:302016-11-30T09:44:40+5:30
अर्जुन रामपाल च्या डॅडी या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार असणार आहेत हे आम्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. आता ...

अखेर त्याचा लुक उलगडला
अ ्जुन रामपाल च्या डॅडी या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार असणार आहेत हे आम्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. आता या चित्रपटातील अर्जूनचा लुक नूकताच उलगडण्यात आला आहे. दगडी चाळ आणि त्यात दडलेली अरूण गवळीची गुन्हेगारी दुनिया आता रुपेरी पडद्यावर उलगडणार असून या सिनेमात अर्जुन रामपाल अरूण गवळी उर्फ डॅडीच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याचा या सिनेमातला फर्स्ट लूकही शेअर केला आहे. त्याने ट्विटरवर अरूण गवळीचा तरुणपणीचा फोटो शेअर केला. त्याचबरोबर त्याचाही सिनेमातला लूक त्याने दाखवला आहे. हे दोन्ही फोटो पाहताना त्यांच्यात फारच साम्य दिसून येते. हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांच्या मनातली या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता अजूनच वाढली असेल यात काही शंका नाही. डॅडी सिनेमाची कथा अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिमच्या अवतीभोवती फिरताना दिसेल. त्यामुळे दाऊदच्या भूमिकेसाठी फरहान अख्तरची निवड करण्यात आल्याचे कळते. दाऊद आणि डॅडी हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. अभिनेता अर्जुन रामपाल आणि फरहान अख्तरची आता चांगलीच मैत्री झाली आहे. रॉक आॅन आणि रॉक आॅन २ नंतर आता हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. इटलीतील रंगभूषाकाराने अर्जुनच्या रंगभूषेचे काम हाती घेतले होते. अर्जुनचा या चित्रपटातील हा पहिलाच लुक एकदम झक्कास दिसत आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना मराठमोळ््या कलाकारांची तगडी फौज देखील पहायला मिळणार असल्याचे अर्जुनने सीएनएक्सला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सांगितले होते.