अॅडल्ट्स ओन्लीचा हटके पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 17:23 IST2017-01-02T17:23:30+5:302017-01-02T17:23:30+5:30
मिलिंद कवडे दिग्दर्शित अॅडल्ट्स ओन्ली या चित्रपटाची मध्यंतरी खूपच चर्चा झाली होती. कारण हा चित्रपटाचे चित्रिकरण आयफोन 6 एस ...
.jpg)
अॅडल्ट्स ओन्लीचा हटके पोस्टर
म लिंद कवडे दिग्दर्शित अॅडल्ट्स ओन्ली या चित्रपटाची मध्यंतरी खूपच चर्चा झाली होती. कारण हा चित्रपटाचे चित्रिकरण आयफोन 6 एस प्लसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांची कथा, नवीन चेहरे, लोकेशन आदी गोष्टींमध्ये निराळे बदल होत असतात. मात्र या नवीन बदलांमुळे या चित्रपटाचे कौतुक होत आहे. आता, या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टरदेखील हटके असल्याचे दिसत आहे. चित्रपटाचे नावाप्रमाणेच या चित्रपटाचे पोस्टर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा होणार हे मात्र नक्की. या चित्रपटाची निर्मिती अमित धुपे आणि अजय ठाकूर यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला आॅगस्टपासून सुरुवात करण्यात आली होती. तसेच या चित्रपटातील आनंद शिंदे यांच्या आपला हात जगन्नाथ या गाण्याने सोशलमीडियावर कल्ला केला होता.विशेष म्हणजे हॉलिवूडनंतर मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा चित्रपट आयफोन शूटवर होत आहे. त्यामुळे एक नवीन प्रयोग प्रेक्षकांना लवकरच अनुभवयाला मिळणार आहे. मराठी फिल्म इंडस्ट्री आता सातासमुद्रापार पोहचली आहेच. आपले चित्रपट परदेशातही झळकत असुन त्यांना जगभरातून वाहवा मिळत आहे. परदेशी चित्रपटांमध्ये वापरले जाणारे टेक्निक आता पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकदेखील नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही. ७ हॉर्स एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शन्स प्रस्तुत अॅडल्ट्स ओन्ली हा चित्रपट आहे. या चित्रपटात कोण कलाकार असणार आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. मिलिंद कवडे यांनी येडयांची जत्रा, शिनेमा, फोर इडियट्स, जस्ट गंमत असे अनेक चित्रपट केले आहेत.
![]()