आदिनाथ कोठारे आणि सिध्दार्थ चांदेकरचा फनी सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 12:57 IST2017-01-30T07:27:55+5:302017-01-30T12:57:55+5:30

जगातील प्रत्येक व्यक्ती हा सध्या सेल्फीच्या प्रेमात पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. लहानांपासून ते मोठयांपर्यत सर्वजणच सेल्फी काढताना दिसत ...

Adinath Kothare and Fiddly Selfie of Siddharth Chandekar | आदिनाथ कोठारे आणि सिध्दार्थ चांदेकरचा फनी सेल्फी

आदिनाथ कोठारे आणि सिध्दार्थ चांदेकरचा फनी सेल्फी

ातील प्रत्येक व्यक्ती हा सध्या सेल्फीच्या प्रेमात पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. लहानांपासून ते मोठयांपर्यत सर्वजणच सेल्फी काढताना दिसत असल्याचे पाहायला मिळते. इतकेच नाही तर, जिथे जाऊ तिथे सेल्फी काढू हा जगण्याचा नियमच बनला असल्याचे दिसत आहेत. सेल्फीबरोबरच विविध अतरंगी सेल्फीदेखील मोठया प्रमाणात पाहायला मिळत असतात. असाच एक झक्कास सेल्फी सध्या सोशलमीडियावर व्हायरल झाला आहे.

           या सेल्फीमध्ये प्रेक्षकांचा लाडका कलाकार आदिनाथ कोठारे हा अभिनेता सिध्दार्थ चांदेकरचा गळा आवळतानाचा हा सेल्फी आहे. असा हा फनी सेल्फी सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तसेच गंमतीशीर कमेंन्टदेखील पाहायला मिळत आहे. आदिनाथ कोठारे आणि सिध्दार्थ चांदेकर यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आदिनाथने आतापर्यत मराठी चित्रपटसृष्टीला माझा छकुला, चिमणी पाखर, पछाडलेला, खबरदार, वेड लावी जीवा, सतरंगी रे, झपाटलेला २, अनवट, इश्क वाला लव्ह, हॅलो नंदन यासारखे अनेक सुपर हीट चित्रपट दिले आहेत.

              तसेच सिध्दार्थने ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याने ही मराठी चित्रपटसृष्टीला झेंडा, बालगंधर्व, सतरंगी रे, प्रेम म्हणजे प्रेम असत, लग्न पाहावे करून, क्लासमेट, आॅनलाइन बिनलाइन, वजनदार, पिंदडान असे अनेक चित्रपट दिले आहेत. या दोन्ही कलाकारांनी नेहमीच आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. नुकताच आदिनाथ हड्रेड डेज् या मालिकेतून पाहायला मिळायला होता. तसेच त्याच्यासोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील झळकली होती. त्यांची ही मालिका रहस्यमय होती. ही मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 

Web Title: Adinath Kothare and Fiddly Selfie of Siddharth Chandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.