'वेलकम' चित्रपटातील मामी झळकली 'झोलझाल' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 06:00 AM2022-07-02T06:00:00+5:302022-07-02T06:00:00+5:30

Supriya Karnik : बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सुप्रिया कर्णिक मराठी चित्रपटात झळकल्या आहेत

Actress Supriya Karnik will be seen in 'Jholzhal' | 'वेलकम' चित्रपटातील मामी झळकली 'झोलझाल' चित्रपटात

'वेलकम' चित्रपटातील मामी झळकली 'झोलझाल' चित्रपटात

googlenewsNext

जिस देश में गंगा रहता है, वेलकम या चित्रपटात झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय ना. या अभिनेत्रीचे नाव आहे सुप्रिया कर्णिक. मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया कर्णिक (Supriya Karnik) या मुळच्या मुंबईमधल्या. अनेकांना आठवत असेल की, त्या 'तिसरा डोळा'' या लोकप्रिय मराठी मालिकेत अभिनेते रमेश भाटकर यांच्यासोबत झळकल्या होत्या. या मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय त्या अनेक हिंदी मालिका आणि सिनेमातही झळकल्या आहेत. नुकताच त्या एका मराठी चित्रपटात झळकल्या आहेत. या चित्रपटाचं नाव आहे झोलझाल (ZolZaal). 

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर सुप्रिया कर्णिक मराठी चित्रपटात झळकल्या आहेत. त्यांचा झोलझाल हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. यात त्यांनी वकिलाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडण्यासाठी अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन अंतर्गत आणि रोलींगडाईस असोसिएशन सोबत निर्माते गोपाल अग्रवाल निर्मित झोलझाल हा चित्रपट सर्वत्र रिलीज झाला आहे. 

झोलझाल या चित्रपटात तब्बल २२ कलाकारांनी काम केले आहे. एका महालाभोवती चित्रपटाची कथा फिरते. तो महल मिळवण्यासाठी कोण काय काय आणि कसे झोलझाल करतात, हे चित्रपट पाहिल्यावर कळेल.

Web Title: Actress Supriya Karnik will be seen in 'Jholzhal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.