सई ताम्हणकरने शेअर विना मेकअप लूकमधील फोटो, चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 16:01 IST2020-10-02T08:00:00+5:302020-10-02T16:01:30+5:30
सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.

सई ताम्हणकरने शेअर विना मेकअप लूकमधील फोटो, चाहते झाले फिदा
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. सईने अलीकडेच तिचा नो मेकअप लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सई या फोटो तिच्या फॅन्स आवडला आहे. त्यांनी लाईक्सच्या माध्यमातून आपली पसंती दर्शवली आहे.
सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी अशी वाटते. सौंदर्य, अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ सईमध्ये दिसत असल्याने रसिक तिचं तोंडभरुन कौतुक करतात. सईने आजवर विविध भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.
दमदार भूमिका साकारणारी सई तितकीच स्टायलिश आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ती लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, तिचा किलर लूक पाहून चाहते झाले खल्लास!