'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची वर्णी,फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:36 PM2021-08-24T17:36:11+5:302021-08-24T17:36:24+5:30

'रावरंभा' सिनेमाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा,शंभू महादेवाच्या साक्षीने,आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या पावन भूमीत संपन्न झाला.

Actress Monalisa Bagal will be featured in Historical Marathi Movie Raavrambha | 'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची वर्णी,फोटो आले समोर

'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची वर्णी,फोटो आले समोर

googlenewsNext

आपल्या दमदार अभिनयाने मराठी सिनेृष्टीत अल्पावधीतच अभिनेत्री मोनालिसा बागलने रसिकांची पसंती मिळवली. 'प्रेम संकट', 'झाला बोभाटा', 'परफ्यूम', 'ड्राय डे', 'गस्त' ,यासारख्या सिनेमांतून मोनालिसा बागलने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.लवकरच ती ऐतिकाहसिक भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे.  "रावरंभा" ऐतिहासिक सिनेमात मोनालिसा झळकणार आहे. सिनेमाचीपटकथा संवाद लेखन प्रताप दादा गंगावणे यांचे असून, अनुप जगदाळे हे दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत.

या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हापासून या सिनेमा विषयी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढणार कारण यातील एका प्रमुख कलाकाराची ओळख प्रेक्षकांसोबत होणार. तर प्रेक्षकांसाठी सरप्राइज म्हणजे या सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

नुकतंच सिनेमाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा,शंभू महादेवाच्या साक्षीने,आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या पावन भूमीत संपन्न झाला. या प्रसंगी  प्रताप दादा गंगावणे, अनुपजी जगदाळे,अभिनेत्री मोनालिसा बागल, 'थोर इतिहासकार भोर'चे  दत्ताजी जगदाळे साहेब,उद्योजक मंगेश दादा जाधव,अभिनेत्री अश्विनी बागल , निर्माते शशिकांत शिला भाऊसाहेब पवार यांचे सह संपूर्ण टीम उपस्थित होती.चित्रपटात नामवंत कलाकार असून,त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होत आहे. तमाम रसिक मायबाप,मित्र,आप्तेष्ट,यांचे आशीर्वाद घेऊन लवकरच 'रावरंभा' आपल्या भेटीला येत आहे.

मोनालिसा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मध्यंतरी तिच्या फोटोंवरून, इंस्टाग्राम रिल्सवरून तिचा Fit & Fine  लूक तिच्या चाहत्यांच्या लक्षात आला होता. वजन कमी केल्या नंतरचे नवीन स्टायलिश आणि ट्रेडिशनल फोटो मोनालिसाने शेअर केले होते. अर्थात, तिचे नवीन फोटो आणि तिच्या या नवीन लूक साठी त्यांनी तिचे कौतुकही केले होते.

Web Title: Actress Monalisa Bagal will be featured in Historical Marathi Movie Raavrambha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.