अभिनेत्री दिव्या दत्ता,सोनाली कुलकर्णी,मयुरी वाघ यांनी लोकमत सखी मंचच्या माध्यमातून महिला चाहत्यांशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2017 12:43 PM2017-03-07T12:43:51+5:302017-03-08T11:39:44+5:30

जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतोय याच निमित्ताने लोकमत सखी मंचशी जोडल्या गेलेल्या सगळ्या महिला 'स्त्री शक्तीला सलाम' ...

Actress Divya Dutta, Sonali Kulkarni, Mayuri Wagh organized dialogue with women fans through Lokmat Sakhi Forum | अभिनेत्री दिव्या दत्ता,सोनाली कुलकर्णी,मयुरी वाघ यांनी लोकमत सखी मंचच्या माध्यमातून महिला चाहत्यांशी साधला संवाद

अभिनेत्री दिव्या दत्ता,सोनाली कुलकर्णी,मयुरी वाघ यांनी लोकमत सखी मंचच्या माध्यमातून महिला चाहत्यांशी साधला संवाद

googlenewsNext
गतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात येतोय याच निमित्ताने लोकमत सखी मंचशी जोडल्या गेलेल्या सगळ्या महिला 'स्त्री शक्तीला सलाम' करण्यासाठी  एकत्र आल्या होत्या.यावेळी आपल्या कर्तृत्वाने अभियक्षेत्र गाजवणा-या महिलांशी संवाद साधत सगळ्या सखींनी काही वेळ मस्त मजा मस्ती करत घालवला.यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिव्या दत्ता आणि मयुरी वाघ यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमात आणखीच रंगत आणली होती. आपल्या आवडत्या अभिनेत्रींचे अनुभव आणि त्यांच्याशी संवाद साधत उपस्थित महिलांनीही बिनधास्त आपलीही मतं मांडली. यावळी फक्त अभिनेत्रीच बोलत नव्हत्या, तर या अभिनेत्री इतर महिलांचेही अनुभव जाणून घेत होत्या.तीन भागात पार पडलेल्या या कार्यक्रमात पहिल्या भागात कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम सोनाली कुलकर्णीसह सीएनएक्सच्या एडिटर जान्हवी सामंत यांनी दिलखुलास संवाद साधला.यावेळी एक अभिनेत्री म्हणून तिला येणारे अनुभव तिने शेअर केले.सोनालीने शेअर केलेला एक खास किस्सा सगळ्यांच्या मनाला स्पर्श करून गेला.सोनालीची आई लष्करात कार्यरत होती.त्यावेळी तिची आई प्रेग्नंट होती.चौथा महिना सुरू होता.त्यावेळी तिच्या आईने एक डान्स परफॉर्म केला होता. अगदी तेव्हापासून सोनालीवर अभिनयाचे गर्भसंस्कार झाले आहेत.आईची स्वप्न सोनालीने पूर्ण केली.अभिनेत्री म्हणून तिने आज सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचे सगळे श्रेय तिच्या आईला जाते असे ती म्हणाली.तिच्या विषयी अनेक रंजक गोष्टी तिने उपस्थित महिलांसह शेअर केल्या. त्यानंतर खरे तर महिला दिनाचे औचित्य साधत आज सगळ्या महिला चाहत्यांशी संवाद साधायला मिळाला त्यामुळे लोकमत सखी मंचसारखे व्यासपीठ खूप गरजेचे असल्याचे तिने सांगितले.महिला दिवस हा फक्त 8 मार्च पुरताच मर्यादित राहु नये. महिलांचा आदर करा,त्यांचा सन्मान हा आपल्या हृदयात कायम असायला पाहिजे.आज प्रत्येक महिला ही सक्षम आहे.त्यामुळे यापलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे सोनालीने सांगितले. सगळ्या महिला चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सोनालीने मनमोकळी उत्तरंही दिली.एक छानसा सेल्फीही क्लिक केला. 



त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता हिने हजेरी लावली.'मी अँड माँ' या नावाने दिव्याने एक पुस्तक लिहिले आहे.या पुस्तकात तिने तिच्या आईसोबतच्या काही गोष्टी शेअर केल्या आहे.गेल्याच वर्षी दिव्याच्या आईने जगाचा निरोप घेतला.आईच्या स्मरणार्थ तिने एक पुस्तक प्रकाशित केले आहे.आपल्या आयुष्यात आईचे स्थान हे सर्वोच्च स्थान आहे. तिची जागा आपल्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही.दिव्याने तिच्या लहानपणीचा एक खास किस्सा यावेळी सांगितला.आईसह दिव्याचे मैत्रिणीप्रमाणेच नाते होते.दिव्याची आई दिव्याला 'राणी बिटीयाँ', 'राजा बेटा' म्हणून बोलवत असे.दिव्या शाळेत शिकत असताना,शाळेच्या कार्यक्रमात एक नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेतील शिक्षकांना राणीच्या भूमिका करण्याची इच्छा विचारण्यात आली.त्यावेळी दिव्याला वाटले की,घरात मला आईच राणी म्हणून बोलवत असते.त्यामुळे मीच राणी आहे असे वाटल्यामुळे तिने तिच्या शिक्षिकेला सांगितले की,मीच तर आहे 'राणी', मात्र काही कारणांमुळे दिव्याला न घेता दुस-या मुलीला या नाटकात राणीच्या भूमिकेसाठी सिलेक्ट करण्यात आले.त्यावेळी दिव्याला खूप वाईट वाटले म्हणून तिने तिच्या आईला प्रश्न विचारला की,मीच तर तुझी राणी बिटीयाँ आहे.मग मला या नाटकात का घेतले नाही? त्यावेळी दिव्याच्या आईने तिला सांगितले, ''बेटा तुम मेरी दुनिया हो, और मेरी दुनिया की आप राणी हो, जब आप अच्छे से बाते समझने लगेंगे, कुछ अच्छा कर पाओगे तब देखना आपकी टिचर के लिये भी आप राणी बन जाओगे'' इतके सुंदर उत्तर ऐकून छोटीशी दिव्याने खूप मेहनत केली आणि आज  फक्त आईमुळेच सिनसृष्टीत आपले नाव कमवले आहे.हा किस्सा ऐकताच उपस्थित महिलांचाही ऊर भरून आल्याचे पाहायला मिळाले. 



त्यानंतर अस्मिता फेम मयुरी वाघ हिने या कार्यक्रमाला एंट्री घेताच महिलांमध्ये वेगळाच जोश पाहायला मिळाला. महिला सक्षमीकरण,महिलांचा सन्मान या मुद्दयांसह महिला सुरक्षेवर मयुरीने गप्पा मारल्या.आपल्या मुलींना डान्स क्लासेस, ड्रॉईंग क्लासेसमध्ये पाठवण्याआधी त्यांना जुडो कराटेच्याही क्लासेला पाठवण्याचे आवाहन मयुरीने उपस्थितांना केले.मुलींना लहानपणापासूनच तू मुलगी आहेस,त्यामुळे हे घालू नकोस,ते करू नकोस अशा बंधनात न ठेवता तिला इतके सक्षम बनवा की,ती स्वत:चे संरक्षण स्वत:करू शकेल. मुलाने रस्त्यात चालताना धक्का मारला तर तिने त्यावेळी गप्प न बसता त्याला चोख प्रत्युत्तर  द्यायला शिकवा.कारण त्यावेळी त्या मुलाने केलेला गुन्हा हा गुन्हाच आहे.मुलींना घाबरवू नका,त्यांना होणा-या अत्याचाराबद्दल लढायला शिकवा आणि हीच काळाची गरज आहे. असा मोलाचा सल्ला मयुरीने यावेळी महिला चाहत्यांना दिला.अशा प्रकारे दिलखुलास आणि मनमोकळा संवाद साधत महिलांनी या अभिनेत्रींशी वेगवेगळ्या गोष्टींवर बिनधास्त गप्पा मारत महिला दिन साजरा केला.

Web Title: Actress Divya Dutta, Sonali Kulkarni, Mayuri Wagh organized dialogue with women fans through Lokmat Sakhi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.