अभिनेत्री अनुजा साठेचा पती आहे प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता, दिसायला आहे इतका हँडसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 17:56 IST2021-02-16T17:52:13+5:302021-02-16T17:56:54+5:30
Actress Anuja Sathe's huband is a famous Marathi actor : संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजानं बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे.

अभिनेत्री अनुजा साठेचा पती आहे प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता, दिसायला आहे इतका हँडसम
अभिनेत्री अनुजा साठेने मराठी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अग्निहोत्र, मांडला दोन घडीचा डाव यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले होते. तिने कॉफी आणि बरेच काही, राखणदार यांसारख्या मराठी चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातून अनुजानं बॉलिवूडमध्ये एंट्री मारली आहे.त्यानंतर ती 'परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमातदेखील दिसली होती. या दोन्ही सिनेमात अनुजाच्या वाट्याला महत्त्वाच्या भूमिका आल्या आहेत. तिने हिंदी आणि मराठी टीव्ही मालिका तसंच मराठी सिनेमात अनुजा साठेने आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे. अनुजा साठेचा पती मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सौरभ गोखले आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. अनुजा आणि सौरभ एकमेकांसोबतचे फोटो नेहमी सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
सौरभ गोखलेने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारल्यापासून त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
विविध मालिकांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या. यानंतर मराठी सिनेमा आणि रंगभूमीवरसुद्धा त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याच अभिनयाच्या जोरावर सौरभने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रोहित शेट्टी दिग्दर्शित व रणवीर सिंग अभिनीत सिम्बा चित्रपटात सौरभ निगेटिव्ह भूमिकेत झळकला होता. सौरभ आणि अनुजाची जोडी मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपलपैकी एक आहे.