"मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता...", मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; म्हणाला, 'लाज वाटते...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 11:08 IST2025-05-23T11:07:08+5:302025-05-23T11:08:11+5:30
अभिनेत्याने व्यक्त केला संताप, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी केलेली पोस्ट चर्चेत

"मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता...", मराठी अभिनेत्याची पोस्ट व्हायरल; म्हणाला, 'लाज वाटते...'
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला आहे. आजही हुंडाबळी जातो हे पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. प्रतिष्ठित कुटुंबातील सासरकडील मंडळींनी वैष्णवीचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. इतका की तिला अक्षरश: आयुष्यच संपवावं लागलं. तिला ९ महिन्यांचं बाळही आहे जे आता तिच्या आईवडिलांकडे आहे. नुकतंच या प्रकरणी फरार आरोपींनाही अटक करण्यात आली. या प्रकरणावर अनेक जण मत व्यक्त करत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही अनेकांनी भावना मांडल्या आहेत.
अभिनेता, निर्माता पुष्कर जोगने (Pushkar Jog) सोशल मीडियावर त्याचा संताप व्यक्त केला आहे. तो लिहितो, "खूप लाज वाटते...जे काही महाराष्ट्रात घडतंय...आधी स्वारगेट प्रकरण आता वैष्णवी...आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का? एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता...पोस्ट टाकली की कोणी ना कोणी तरी ट्रोल करतंच...पण गप्प बसून नाही चालणार ना...माणुसकी आणि आपल्या समाजातल्या निरागस भगिनींचा प्रश्न आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्या. वैष्णवीला न्याय द्या. जोग बोलणार."
पुष्कर जोग कायम त्याचं मत सोशल मीडियावर बेधडकपणे मांडत असतो. मग ते इंडस्ट्रीबद्दल असो किंवा सामाजिक विषय असो. तो बिंधास्तपणे त्यावर मोकळेपणाने बोलतो. पुष्करला छोटी मुलगीही आहे जिचं नाव फेलिशा आहे. लेकीसोबतचे फोटो तो कायम सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या पुष्कर आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकताच त्याचा 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाही रिलीज झाला.