अभिनय माझं सर्वस्व-अभिनेता सायंकित कामत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 18:28 IST2018-06-02T12:58:46+5:302018-06-02T18:28:46+5:30

अबोली कुलकर्णी ‘रात्रीस खेळ चाले’,‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला हॅण्डसम अभिनेता सायंकित कामत झी मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं ...

Acting is my acting-actor, Cynct Kamat | अभिनय माझं सर्वस्व-अभिनेता सायंकित कामत

अभिनय माझं सर्वस्व-अभिनेता सायंकित कामत

ong>अबोली कुलकर्णी

‘रात्रीस खेळ चाले’,‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला हॅण्डसम अभिनेता सायंकित कामत झी मराठी वाहिनीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतो. या मालिकेतून तो समीरची व्यक्तिरेखा रंगवतो आहे. समीर आणि मीरा यांची लव्हस्टोरी मालिकेत चित्रीत करण्यात आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या गप्पा..

* ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिका सध्या खूप गाजतेय. कोणता नवीन ट्रॅक आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार?
- मालिकेत फार काही वेगळा ट्रॅक बघायला मिळणार नाहीये. खरंतर समीर हा आता घरात एकटा पडला आहे. त्याच्या बाजूने कुणीही नसल्याचं त्याला जाणवत आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कुठेतरी हरवला आहे. समीरच्या अशा वागण्यामुळे मला अनेक चाहत्यांचे प्रश्न येतात की, समीर स्टँड का घेत नाहीये? तो ठोस काहीतरी निर्णय का घेत नाहीये. पण, आता फक्त मी एवढंच सांगू शकतो की, वेट अ‍ॅण्ड वॉच लवकरच कळेल की मालिकेत अजून काय काय होणार आहे ते.

* मालिकेचे नवे कथानक, युवापिढीच्या प्रेमाबाबतीतील कन्सेप्ट, मॉडर्न विचारांचे कुटुंब असं सगळं असताना तुझ्याकडे  जेव्हा मालिकेची आॅफर आली तेव्हा तुझी पहिली रिअ‍ॅक्शन काय होती?
-  खरंतर सध्याच्या युवापिढीचा विचार केला तर असं लक्षात येतं की, प्रेम, ब्रेकअप या गोष्टी सध्या सगळीकडेच सुरू आहेत. त्यांना त्यांच्यासमोर उभे ठाकलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. याला जबाबदार आहे सध्याची परिस्थिती. कामाचा ताण, दुरावलेला संवाद यामुळे दोन प्रेमी जीवांची मनं दुरावतात. त्यामुळे मला हा काहीसा नवा विषय वाटला. युवापिढीला रूचेल, पटेल असा वाटला, म्हणून मी लगेचच मालिकेसाठी होकार देऊन टाकला. 

* ‘हया गोजिरवाण्या घरात’, ‘रात्रीस खेळ चाले’ आणि आता तुझं माझं ब्रेकअप कसा होता आत्तापर्यंतचा प्रवास? कसं वाटतं मागे वळून बघताना? 
- नक्कीच छान वाटतंय. मला विश्वास बसत नाही की, मी खरंच इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. मी ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका करत होतो तेव्हा मला त्यातला माझा रोल काही आवडत नव्हता. पण त्यावेळी दिग्दर्शकाला काय वाटले माहित नाही पण, ते नवी मालिका सुरू करणार आहेत असे त्यांनी मला सांगितले. मग आता मी माझ्या कामामुळे समाधानी आहे. सतत काम करत राहतो. त्यामुळे मला खूप काही शिकायला मिळतं.

* तू जर अभिनेता नसला असतास तर कोणत्या क्षेत्रात तुला करिअर करायला आवडलं असतं?
- खरं सांगायचं तर मला गाड्या खूप आवडतात. गाड्यांचं डिझाईन आवडतं. मला इंजिनियर व्हायचं होतं. १२ वी सायन्सनंतर मला आॅटोकॅड करायचं होतं. पण, अभिनय क्षेत्राकडे वळलो आणि याच क्षेत्राला आपलंसं करून टाकलं. 

* अभिनय तुझ्यासाठी काय आहे?
- अभिनय माझ्यासाठी सगळं काही आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते की, आपण विचार करतो की, मी का जगतोय? असाच प्रश्न काही वर्षांपूर्वी माझ्याही मनात डोकावला. मला जगण्याचं काहीही साधन मिळत नव्हतं. तेव्हा मी ललित कला केंद्रात गेलो. तेव्हा मला कळालं की, होय मी याच कलेसाठी जगतो आहे. आता मला जगण्याचा अर्थ उमगला आहे. त्यावेळेपासून मी कायम काम करत राहतो. जास्त शूटींग करायलाही मी कायम तयार असतो. मला कायम बिझी राहणं आवडतं.

* तू तुझ्या आयुष्यात स्टाईल आयकॉन कुणाला मानतोस?
- माझ्या आयुष्यात असा कोणी स्टाईल आयकॉन नाहीये. खरंतर इंडस्ट्रीतील सगळेच जण आपापल्या स्टाईलने काम करत असतात. प्रत्येकाची आपली एक वेगळी स्टाईल असते. त्यामुळे मी कुणालाही कॉपी न करता प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतो. 

Web Title: Acting is my acting-actor, Cynct Kamat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.