​ अभिनयने दिला लक्षाच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 11:39 IST2016-12-20T11:39:26+5:302016-12-20T11:39:26+5:30

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनय आता त्याच्या करिअरचा श्रीगणेशा करण्यासाठी सज्ज ...

Acting gives light to Laksy's memories | ​ अभिनयने दिला लक्षाच्या आठवणींना उजाळा

​ अभिनयने दिला लक्षाच्या आठवणींना उजाळा

्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे सध्या चित्रपटसृष्टीमध्ये चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनय आता त्याच्या करिअरचा श्रीगणेशा करण्यासाठी सज्ज झालाय. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनयने देखील हीरो बनण्याचेच स्वप्न उराशी बाळगले. ती सध्या काय करतेय या चित्रपटातून तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये अभिनयने वडिलांना म्हणजेच सर्वांच्या लाडक्या लक्षाला वंदन केले आहे. एका डान्स परफॉरमन्समधून लक्षाच्या या लाडक्या लेकाने त्याला ट्रीब्युट दिला आहे. लक्षाच्या अभिनयाला प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत आणि आता त्याच्या रिअल लाईफमधील अभिमनयाला म्हणजेच त्याच्या मुलाला देखील प्रेक्षक पसंती देतील असे वाटतेय. लक्ष्मीकांत बेर्ड हे नाव मराठी चित्रपटाच्या इतिहासातच सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. आई-वडिलांकडुन मिळालेला हा अभिनयाचा वारसा आता हा अभिनय कसा चालवतो हे प्रेक्षकांना समजेलच. एका कार्यक्रमामध्ये सर्वांचा लाडका अभिनेता  लक्ष्याच्या आठवणींना उजाळा देणार आहेत त्याचे काही सहकलाकार... १६ डिसेंबर हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृती दिन. या दिवशी या लाडक्या अभिनेत्याने या जगातून एक्झिट घेतली होती, परंतू मागे ठेवल्या होत्या असंख्य आठवणी. त्यांच्या याच आठवणींना या भागांमधून उजाळा देण्यात येणार आहे. या भागात महेश कोठारे, विजय कदम, निवेदिता सराफ, किशोरी अंबिये आणि इतर काही कलाकार सहभागी झाले होते. विशेष म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनयसुद्धा या भागात सहभागी झाला होता. अभिनयने 'हमाल दे धमाल' चित्रपटातील गाण्यावर डान्स करुन बाबांची आपल्यातली झलक दाखवून दिली.. येत्या ६ जानेवारी रोजी अभिनयचा 'ती सध्या काय करते' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Acting gives light to Laksy's memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.