गमतीशीर गोष्टीला २ वर्ष पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 12:51 IST2016-08-04T07:21:18+5:302016-08-04T12:51:18+5:30
झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतील श्री आणि छोटी आई लवकरच रंगभूमीवर एकत्र दिसणार, अशी जोरदार चर्चा ...

गमतीशीर गोष्टीला २ वर्ष पूर्ण
म्ही कोणत्या नाटकाविषयी बोलतोय हे प्रेक्षकांना कळलंच असेल. सोनल प्रॉडक्शन्स आणि नाट्यसुमन निर्मित ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाला आज २ वर्ष पूर्ण झाली आणि या नाटकाचे ३२५ प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाले. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे या नाटकाचे अजूनही दौरे चालू आहेत.
‘अद्वैत दादरकर दिग्दर्शित आणि मिहिर राजदा लिखित ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक प्रेक्षकांना इतके आवडले आणि आपलेसे वाटले की या नाटकाचा दुसरा भाग ही येणार आहे. या नाटकाला महाराष्ट्रात तर प्रतिसाद मिळालाच पण परदेशातील मराठी प्रेक्षकांना पण या नाटकाचा अनुभव घेता आला.
नाटकात प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार शशांक केतकर, मंगेश कदम आणि लीना भागवत यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे.