शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:00 IST2025-07-18T15:58:58+5:302025-07-18T16:00:36+5:30
मराठी अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, नक्की काय घडलं?

शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
शाहरुख खान (Shahrukh Khan) हे नाव फक्त बॉलिवूडच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. रोमान्सचा बादशाह, किंग खान अशीही त्याची ओळख आहे. नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने यशराज फिल्म स्टुडिओ मध्ये जाहिरातीचं शूट केलं. यामध्ये तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर केली. यावेळी तिची मेकअप रुम चक्क शाहरुख खानच्या मेकअप रुमच्या बाजूला होती. तिने बिहाइंड द सीन्स फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
मराठी मालिका, सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री आहे गौरी नलावडे(Gauri Nalawade). ती काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ मल्होत्रासोबत एका जाहिरातीत दिसली. अंधेरीतील यशराज स्टुडिओमध्ये याचं शूटिंग झालं. गौरी वेटरेसच्या लूकमध्ये दिसत आहे. तिची क्युट हेअरस्टाईलही आहे. गौरीने या जाहिरातीचे काही बिहाइंड द सीन्स फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती 'शाहरुख खान' नावाच्या पाटीकडे बोट दाखवत उभी आहे. ती लिहिते, "इंटरेस्टिंग दिवस आणि बिहाइंड द सीन्स. आपल्या मेकरुपबाहेर 'ही' मेकअपरुम दिसणं? किती भारी. या संधीसाठी खूप खूप आभार."
गौरीच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे. अनेक लाईक्स आणि कमेंट्स तिच्या या पोस्टवर आल्या आहेत. गौरी ३७ वर्षांची आहे. तिने 'स्वप्नांच्या पलिकडले' या गाजलेल्या मराठी मालिकेत काम केलं आहे. तसंच ती 'गोदावरी', 'कान्हा', 'फ्रेंड्स', 'फॅमिली कट्टा', 'तर्री', 'जँगो जेडी', 'अधम' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.