पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:15 IST2025-05-03T16:15:34+5:302025-05-03T16:15:58+5:30
अभिनेत्रीला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने गोंडस बाळाला जन्म दिला.

पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' फेम अभिनेत्री अमृता पवार आई झाली आहे. अमृताने काही महिन्यांपूर्वीच आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता अमृताच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावरुन ही गोड बातमी अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अमृताला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने गोंडस बाळाला जन्म दिला.
अमृताने २६ एप्रिल २०२५ रोजी चिमुकल्याला जन्म दिला. मुलगा झाल्याची बातमी तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आहे. आई झाल्याने सोशल मीडियावर चाहते अमृताचं अभिनंदन करत आहेत. लग्नानंतर दीड वर्षांनी अमृता आई झाली आहे. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
अमृताने काही मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतही ती दिसली होती. २०२२मध्ये अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता ते आईबाबा झाले आहेत.