'राम तेरी गंगा मैली'च्या मंदाकिनीनं सांगितलं धक्कादायक वास्तव, हिरोंमुळे अभिनेत्रीच्या बाबतीत घडायच्या या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 15:10 IST2025-07-18T15:10:17+5:302025-07-18T15:10:40+5:30
मंदाकिनी(Mandakini)ने १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूरच्या 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) या दमदार चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

'राम तेरी गंगा मैली'च्या मंदाकिनीनं सांगितलं धक्कादायक वास्तव, हिरोंमुळे अभिनेत्रीच्या बाबतीत घडायच्या या गोष्टी
बॉलिवूडच्या ग्लॅमरस इंडस्ट्रीत अनेक लोक आपले नशीब आजमावण्यासाठी येतात, परंतु त्यापैकी काही मोजक्याच लोकांना त्यांच्या कारकिर्दीत यश मिळते. मंदाकिनी(Mandakini)चे नावही याच यादीत येते. तिने १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूरच्या 'राम तेरी गंगा मैली' (Ram Teri Ganga Maili) या दमदार चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.
राजीव कपूरसोबतची तिची जोडी आणि तिच्या सुंदर शैलीने तिला एका रात्रीत स्टार बनवले. पण या स्टारडममागे असे काही घडले ज्याचा सामना मंदाकिनीसारख्या मोठ्या स्टारलाही करावा लागला. मंदाकिनीने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की १९८० आणि ९० च्या दशकात पुरुष कलाकार चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवत असत. तिने सांगितले की अनेकदा चित्रपटाचा नायक ठरवत असे की त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री घ्यायची आणि कोणाला नाही. ती पुढे म्हणाली की, जर एखाद्या नायकाला एखादी अभिनेत्री आवडत नसेल किंवा तिच्याशी भांडण झाले असेल तर निर्माता आणि दिग्दर्शक सहजपणे त्याच्या शब्दांना मान्यता देत असत आणि दुसरी अभिनेत्री घेत असत.
अभिनेत्यामुळे हातातून निसटला सिनेमा
या मुलाखतीदरम्यान जेव्हा तिला विचारण्यात आले की त्यावेळी तू ही परिस्थिती कशी हाताळलीस, तेव्हा मंदाकिनीने होकार दिला आणि म्हणाली की, ''हो, माझ्यासोबत दोनदा असे घडले जेव्हा एका मोठ्या अभिनेत्याला माझ्यासोबत काम करायला आवडत नसल्यामुळे मला काढून टाकण्यात आले.''
जास्त मानधनामुळे मंदाकिनीला दाखवला बाहेरचा रस्ता
तिच्या यशादरम्यानही मंदाकिनीने इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी खूप संघर्ष केला. एक अनुभव सांगताना ती म्हणाली की, एका निर्मात्याने तिला पटकथा सांगितली, ती ऐकल्यानंतर तिने होकार दिला. पण काही दिवसांनी असे जाहीर करण्यात आले की, त्या चित्रपटात दुसऱ्याच अभिनेत्रीला कास्ट करण्यात आली आहे. यामागील कारण विचारले असता कळले की, मंदाकिनी या चित्रपटासाठी १ लाख रुपये घेत होती तर दुसरी अभिनेत्री ७५ हजार रुपये घेण्यास तयार होती.